विशेष मुलांचा समावेश असलेला रनवे इन्स्पिरेशन फॅशन शो जीटीडीसीच्या सहकार्याने गोव्यात होणार साजरा

0
931

 

पणजी:रनवे इन्स्पिरेशन, हा झगमगता फॅशन शो २१ जानेवारी २०१८ रोजी आयोजित
करण्यात आला असून तो गोव्याच्या उदयोन्मुख फॅशन डिझायनर व उद्योजक अनुषा शेख यांना नवा चेहरा
देईल. गोवा पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडच्या (जीटीडीसी) सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा
फॅशन शो विशेष मुलांना रॅम्पवर उतरवून प्रकाशझोतात आणत मने जिंकणार आहे. हा कार्यक्रम झुरी हॉटेल
आणि रिसॉर्ट, गोवा येथे पार पडेल.
चॅरिटी उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोची रचना २१ वर्षीय अनुषा शेख यांनी केली असून
त्या फॅशन विश्वात कारागिरीचा नवा, वेगळा दृष्टीकोन आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
उच्चभ्रू सोहळ्याप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोमध्ये भारतात पहिल्यांदाच खास मुलांना
फॅशन रॅम्पवर चालण्याची संधी मिळणार आहे. व्यावसायिक मडेल्स, बॉलिवूड सेलिब्रेटीज आणि फॅशनचे तरुण
चाहते या खास मुलांबरोबर रॅम्पवर चालतील. अनुषा शेख या सोहळ्यासाठी वस्त्रप्रावरणांचे खास आयोजन व
विभागणी केली असून त्यात किड्स रेंज, इंडो वेस्टर्न आणि एथनिक्स यांचा समावेश आहे.
पहिल्या सिक्वेन्समध्ये किड्स रेंज सादर केली जाणार असून त्यात १५ कपड्यांचा समावेश आहे. त्यानंतर
येणाऱ्या दुसऱ्या सिक्वेन्समध्ये इंडो वेस्टर्न कपड्यांचा समावेश असून त्यातल्या प्रत्येकाला पारंपरिक भारतीय
टच देण्यात आला आहे. शेवटच्या सिक्वेन्समध्ये पारंपरिक भारतीय वस्त्रांचा समावेश असून त्यातच वधूसाठीचे
पाशोख पाहायला मिळतील. विशेष मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा शो आयोजित करण्यात आला आहे, जिथे
त्यांना डिझायनर कपड्यांत रॅम्पवर चालण्याची संधी मिळेल. चॅरिटीसाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने हा शो
आयोजित करण्यात आला आहे. फॅशनला नवा चेहरा देत इथली वस्त्रप्रावरणे परिधान केली जातील व दोन
तासांच्या या कार्यक्रमात विशेष मुलांद्वारे ती सादर केली जातील.
जीटीडीसीने या जनहित कार्यक्रमाला मदत करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी अनुषा व सहकाऱ्यांना
पाठिंबा दिला आहे.
झुरी हॉटेल्स, व्हीएचपी ज्वेलर्स, किस्वा सलॉन, चेतना स्कूल, विन्सन वर्ल्ड, शम्मी फोटोग्राफी, प्रसाद
फोटोग्राफी, व्हिवा गोवा मासिक, मर्सिडीज बेंझ आणि डीजे मोईन हे या कार्यक्रमाचे भागीदार आहेत.

गोवा पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष निलेश कब्राल,  म्हणाले, ‘अनुषा शेख यांनी हाती घेतलेल्या या
उपक्रमाने मी भारावून गेलो आहे, ज्यानिमित्ताने भारतात पहिल्यांदाच विशेष मुलांना फॅशन शोमध्ये रॅम्पवर
चालण्याची संधी मिळणार आहे. अशाप्रकारचा हृदय हेलावणारा आणि विचार करायला लावणाऱ्या
सोहळ्याची संकल्पना सादर केल्याबद्दल मी अनुषा यांचे अभिनंदन करतो. जीटीडीसी कायमच सर्जनशीलता,
नाविन्य आणि चांगल्या कामासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देत आली आहे. मी
फॅशनच्या गोव्यातील तरुण चाहत्यांना विनंती करेन, की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन या सोहळ्यास पाठिंबा
द्यावा व भविष्यातही या खास मुलांना मुबलक संधी द्याव्यात.’
अनुषा शेख म्हणाल्या, ‘आधुनिक पिढीचा भाग असल्यामुळे आजकाल प्रत्येक मुलाला आपण फॅशन
व्यासपीठाचा भाग व्हावेसे वाटते. हेच लक्षात घेऊन या मुलांना प्रत्येक सामान्य व्यक्तीप्रमाणे संधी देण्याचा
विचार केला, ज्यामुळे त्यांनाही ग्लॅमर व प्रकाशझोताचे जग अनुभवता येईल. फॅशन आणि ग्लॅमर विश्वात क्रांती
घडवण्याची क्षमता असलेली ही खास मुले आमची तरुण मॉडेल्स असतील, ज्यांना प्रशिक्षकांअंतर्गत खास
प्रशिक्षण दिले जाईल व तयार केले जाईल. यातून त्यांना स्वतःला समाजाच्या प्रमुख प्रवाहात स्वतःला
पाहाण्याची आशा व प्रोत्साहन मिळेल.’
अनुषा शेख यांच्याबद्दल
त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून फॅशन क्षेत्राचा मास्टर डिप्लोमा त्यांनी केला आहे. अनुषाज हे स्वतंत्र
शैलीचे लेबल त्यांनी विकसित केले असून त्यात भारतीय पारंपरिकता आणि अत्याधुनिकता यांचा संगम एका
प्रयोगशील पद्धतीने साधण्यात आला आहे. त्यांच्याकडे वधूच्या पोशाखापर्यंतचे सर्व प्रकारचे नाविन्यपूर्ण
कलेक्शन आहे. अनुषा आतापर्यंत विविध सेलिब्रेटी डिझायनर्स आणि रेंज लाँचमध्ये सहभागी झाल्या आहेत
तसेच विविध फॅशन स्पर्धाही जिंकल्या आहेत. त्यांनी मल्टी डिझायनर्स स्टोअर्सशी फॅशनची अद्यावत श्रेणी लाँच
करण्यासाठी सहकार्य केले आहे. नेमकेपणा, परस्परविरोधी रंगसंगती, मोत्यांपासून लेसेसपर्यंतची कुशल
हस्तकारागिरी, नाजूक दागिन्यांची रचना यांचा संगम त्यांच्या कामात आढळतो. सभोवतालच्या संस्कृतीपासून
सातत्याने प्रेरणा घेत नव्याचा शोध घेणे त्यांना आवडते.