गोवा खबर:पोस्ट मास्तर जनरल, गोवा विभागाच्या वतीने 25 जून 2019 रोजी 40 व्या विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्ट मास्तर जनरल, पणजी यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डरविषयक तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल त्यांची दखल या डाक अदालतीमध्ये घेतली जाईल. यासाठी 18 जूनपूर्वी श्री जी राजेश, सचिव डाक अदालत आणि सहायक संचालक, टपाल सेवा, पोस्ट मास्तर जनरल कार्यालय, पणजी या पत्त्यावर 18 जूनपूर्वी पाठवण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.