24 तासात कोविड मुळे दोघांचा मृत्यू;कोविड बळींचा आकडा11वर

0
205
गोवा खबर:गोव्यात गेल्या 24 तासात कोविड मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.या दोन मृतांमुळे कोविड बळींचा आकडा आता 11 झाला आहे.विशेष म्हणजे 11 पैकी 6 रुग्ण वास्को मधील आहेत.
राज्यात दिवसाला  शंभर रुग्ण मिळू लागले असताना मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे.कोविड हॉस्पिटल मधील आयसीयू मध्ये दाखल असलेल्या वास्को येथील 80 वर्षीय इसमाचे उपचार सुरु असताना निधन झाले आहे.त्याच बरोबर बायणा-वास्को येथील अन्य एका 31 वर्षीय रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.