2022 मध्ये काॅंग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा : गिरीश चोडणकर

0
270
गोवा खबर :२०२२ च्या विधानसभा निवडणुकांत विजयी होऊन भाजपची असंवेदनशील व भ्रष्ट राजवट संपविण्यासाठी गोव्यातील जनता आज काॅंग्रेस पक्षाकडे आत्मविश्वासाने पाहत आहे. काॅंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या भावनांचा आदर राखुन, स्वत: कष्ट सोसुन जनतेचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दक्षिण गोव्यातील काॅंग्रेस गट अध्यक्षांच्या पहिल्या गटाच्या बैठकित बोलताना केले. आज काँग्रेस पक्षाने पुर्ण जोमाने कार्य करुन पक्ष संघटना बळकट करावी व समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या विघातक शक्तींचा पराभव करावा असे ते पुढे म्हणाले. 
 बैठकीला काॅंग्रेस विधीमंडळ गट नेते आमदार दिगंबर कामत, सरचिटणीस सुभाष फळदेसाई व प्रदीप नाईक तसेच दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस उपस्थित होते.
२०१२ मध्ये लोकांची दिशाभूल करुन भाजपने सत्ता मिळवली व सन २०१७ मध्ये अलोकशाही मार्गाने सत्ता काबीज केली. आज भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले असुन, गोवा राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलण्याचे काम भाजपने केले आहे. असंवेदनशील व लोक भावनांचा आदर न करणाऱ्या भाजपला २०२२ च्या निवडणुकांत दोन अंकी आमदार निवडुन आणणे शक्य होणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
गट स्थरावर प्रामाणिक पणे व काॅंग्रेस पक्षाची शिस्त पाळुन प्रत्येक गटांनी काम करावे व काॅंग्रेस पक्षाला नवचेतना आणावी असे आवाहन कामत यांनी उपस्थित गट अध्यक्षांना केले.
राज्याला आर्थिक संकटातुन बाहेर काढण्याचे काम केवळ काॅंग्रेस पक्षाचे सरकार करु शकते असे चोडणकर म्हणाले.
भ्रष्टाचाराला लोकायुक्तांचे प्रशस्तीपत्र लाभलेले गोव्यातील भाजप सरकार हे एकमेव आहे असा टोला  कामत यांनी हाणला.
सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी सर्व गट समितींचा आढावा या बैठकीत घेतला व गट अध्यक्षांना काॅंग्रेसचे कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले. काॅंग्रेसची सदस्यता मोहिम अधिक नेटाने पुढे नेण्याचे त्यानी सर्व गट अध्यक्षांना सांगितले.
  • या बैठकीला पुष्कल सावंत (कुडचडे), आसिझ नोरोन्हा (कुंकळ्ळी), गोपाळ नाईक ( मडगाव), मान्युएल कुलासो ( केपें), मान्युएल डिकोस्ता (नूवें), प्रलय भगत ( काणकोण), रोयन वियेगस (वेळ्ळी), इमरान शेख (वास्को), महेश नाईक ( मार्मागोवा) हे गट अध्यक्ष उपस्थित होते. 
काॅंग्रेसच्या इतर गट अध्यक्षां बरोबर प्रदेश अध्यक्ष व विधीमंडळ गट नेते यांच्या बैठका सप्टेंबर अखेर पर्यंत चालुच राहणार आहेत. गांधी जयंती दिनी २ ॲाक्टोबर पासुन सर्व गट समित्या कार्यरत करण्याचा त्यांचा उद्देश आहे.