2022 पर्यंत नवीन भारताला घडवणार : मोदी

0
874
The Prime Minister, Shri Narendra Modi at the Indian Community Event, in Stockholm, Sweden on April 17, 2018.

स्टोकहोम येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन

 

गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टोकहोम येथील भारतीय  समुदायाला संबोधित केले. त्यांनी स्वीडन सरकारचे विशेषतः स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी केलेल्या आतिथ्यपूर्ण स्वागतासाठी आभार मानलेत.

पंतप्रधान मोदी पुढे  म्हणालेत की, भारत आज परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. सध्याचे केंद्र सरकार  हे सबका साथ सबका विकास, या विचारांच्या आधारे निवडून आले.  सरकारने  गेल्या चार वर्षात , विकास  आणि  भारताच्या समावेशक विकासात्मकतेवर भर दिला असून हे  सर्व प्रयत्न  वर्ष 2022 पर्यंत नवीन भारताला घडविणे हे आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस, जागतिक पातळीवर भारताकडील वैचारिक  नेतृत्वासाठी पुन्हा एकदा जोर देणे   यावर प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले . मोदी पुढे  म्हणाले की, सर्व जग भारताकडे विश्वासाने बघत असून यासाठी मानवतावादी दृष्टीकोन , सुरक्षा प्रयत्न  तसेच आंतरराष्ट्रीय  सौर ऊर्जा चळवळ, तसेच एम टी सी आर सारख्या  सदस्यत्वाकरिता मुख्य दिशानिर्देश, वासेनार करार आणि ऑस्ट्रेलिया समूह या बाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी जगाने भारताच्या  अंतराळ कार्यक्रमाबरोबर तंत्रज्ञान क्षमते बाबत दखल घेतल्याचे सांगितले

डिजिटल  पायभूत सेवांमुळे नागरिक आणि सरकार यांच्या दरम्यान असलेले संबंध बदलत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञानामुळे विश्वासार्हता  आणि पारदर्शकता वाढली आहे.  ते पुढे म्हणाले की, सरकारशी संलग्नता  ही आता संधी नसून प्रॅक्टिस झाली आहे. त्वरित  फाईल्सचा  निपटारा, व्यवसायातील सुलभता , वस्तू व सेवा कर , प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण तसेच उज्वला योजनेच्या माध्यमातून स्वयंपाकासाठी गॅस मिळवून देणे यावर जोर देण्यात येत आहे.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना नवनवीन संधी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सध्या 74 उद्यमशील महिला  लाभार्थी ना याचा फायदा झाला आहे. त्यांनी अटल  नाविन्यता मिशन, स्किल आणि स्टार्ट  अप इंडिया याबाबतही माहिती सांगितली.

आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे नूतन उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी  भारत प्रयत्नशील आहे. त्यांनी यासाठी स्वीडन आणि इस्त्राईलशी केलेल्या नवीनतम  भागीदारीची माहिती सांगितली. त्यांनी सरकारतर्फे  जीवनातील सुलभतेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसंदर्भात उपस्थितांना अवगत केले त्यांनी “आयुष्यमान भारत”  या भारताच्या आरोग्याशी संबंधित  जागतिक  पातळीवरील  सर्वात  मोठ्या योजनेचा उल्लेख केला. हे  सर्व निर्णय भारताच्या परिवर्तनाची नांदी असल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले. सर्वात शेवटी स्वीडन आणि इतर नॉर्डिक देशांबरोबर असलेली भागीदारी कशी महत्वाची आहे  हे सांगितले.

पंतप्रधानांनी भावनिक संबंधाबरोबरच भारतात व्यापार, गुंतवणुकीसंदर्भात अनेक संधी असल्याचे सांगितले.