2020 पर्यंत देशातील  718 जिल्ह्यांमध्ये पोषण अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार

0
1086

भारतातील पोषणविषयक आव्हानांसंदर्भातील राष्ट्रीय परिषदेची दुसरी बैठक

गोवा खबर:भारतातील पोषणविषयक आव्हानांसदर्भातील राष्ट्रीय परिषदेची दुसरी बैठक 24 जुलै 2018 रोजी नवी दिल्लीत पार पडली. देशभरातील सर्व स्तरातील आणि वयोगटातील नागरिकांना पोषण आहार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने 2020 सालापर्यंत देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 718 जिल्ह्यांमध्ये पोषण अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. परिषदेच्या यापूर्वीच्या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार केलेल्या उपाययोजनांचा अहवाल महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने यावेळी सादर केला. पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरुप देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने एक कॉलर ट्यून आणि रिंग ट्यून विकसित केली आहे. “सही पोषण, देश रोशन” या उक्तीला अनुसरुन पोषक आहाराबाबत जनजागृतीचे प्रयत्न केले जाणार आहेत. विविध वयोगटातील बालके आणि महिला, नागरिकांसाठी योगविषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने आयुष मंत्रालयाने सहाय्य मागितले आहे. देशभरातील 36 जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नासकॉम फांउडेशनचे सहकार्य स्वीकारण्याची इच्छा महिला आणि बालविकास मंत्रालयाने व्यक्‍त केली आहे. त्यानुसार एक सामंजस्य करार अपेक्षित असून त्या माध्यमातून पोषण विषयक जनजागृतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान, महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या 10 जिल्ह्यांमधील संबंधित विभाग आणि सचिवालयाचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले.

देशभरात दरवर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जाणार अ