2017-18 या वर्षात भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ: सुरेश प्रभू 

0
793

 गोवा खबर:जागतिक स्तरावरच्या वाढत्या बचावात्मक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवरही भारताच्या निर्यातीत चांगली वाढ झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. असोचेमतर्फे नवी दिल्लीत आयोजित दुसऱ्या सर्व्हिसेस एक्सलेन्स पुरस्कार आणि सम्मेलनात ते आज बोलत होते. चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात साडे तीनशे अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंतचा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवा क्षेत्रामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. सेवा क्षेत्रांचे वाढते महत्व लक्षात घेत केंद्र सरकाने 12 चॅम्पियन सेवा क्षेत्रे निर्धारित केली असून त्यांच्या विकासासाठी 5 हजार कोटी रुपयांचा समर्पित निधी मंजूर केला आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली.

या समारंभात प्रभू यांनी असोचेमतर्फे तयार करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाचे प्रकाशन केले. तसेच 28 सेवा क्षेत्रांसाठीचे उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले.