2017 नंतर रिया चक्रवर्तीशी संपर्क नाही:गौरव आर्या

0
294
गोवा खबर:बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात रिया चक्रवर्तीच्या वॉट्स एप्प चॅट मधून ड्रग्स संदर्भात चर्चेत आलेल्या गोव्यातील हॉटेल उद्योजक गौरव आर्याने 2017 नंतर आपला रिया चक्रवर्ती सोबत कोणताच संपर्क आलेला नाही.आपण सुशांत सिंह राजपूतला ओळखत नसून या प्रकरणात आपल्याला का गोवण्यात आले हेच आपल्याला कळत,नसल्याचा दावा केला आहे.
रिया चक्रवर्तीच्या वॉट्स एप्प चॅट मध्ये ड्रग्सशी संदर्भात गौरव आर्याचे नाव आल्यापासून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात तपास यंत्रणांचा मोर्चा गोव्याकडे वळला आहे.
गौरव आर्याचे उत्तर गोव्यातील हणजुणे किनाऱ्या जवळ टॅमरींड नावाचे हॉटेल आहे.शिवोली येथील एका आलीशान अपार्टमेंट मध्ये त्याने एक फ्लॅट देखील भाड्याने घेतला आहे.गौरवचे नाव समोर आल्यापासून मीडियाचे पत्रकार त्याच्या हॉटेल आणि घरा समोर ठाण मांडून बसले होते मात्र गौरव त्यांना गूंगारा देण्यात यशस्वी झाला होता.सक्तवसूली संचालनालयाने(ईडी) गौरवला चौकशीला बोलावण्यासाठी बजावलेली नोटिस तो सापडू न शकल्याने त्याच्या हॉटेलच्या गेटवर चिकटवली होती.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तपासा करणाऱ्या ईडीने 31 ऑगस्ट रोजी गौरवला नोटिस बजावून मुंबई येथील ऑफिस मध्ये चौकशीसाठी बोलावल्याने गौरव आज दुपारी 3 वाजता दाबोळी विमानतळावरुन मुंबईस रवाना झाला.
गौरव निळ्या रंगाच्या कारने विमानतळावर दाखल झाला.तो स्वतः कार चालवत होता.त्याने डी-4 गेटवर आईला खाली उतरवले. त्यानंतर मीडियाच्या पत्रकारांनी त्याच्या कारला गराडा घालताच तो तेथून पुढे निघुन गेला.पत्रकारांनी त्याच्या आईवर प्रश्नांची सरबत्ती केली मात्र तिने कोणत्याच प्रश्वाला उत्तर दिले नाही.
काही वेळानंतर डी-4 गेटवर आला त्यावेळी पत्रकारांनी  विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण सुशांतला ओळखत नाही,असा दावा गौरवने केला.2017 नंतर रियाशी आपला संपर्क नसून या प्रकरणात आपले नाव का गोवण्यात आले हे आपल्याला समजले नाही.आपण तपास यंत्रणांना सहकार्य करणार आहोत असे सांगत गौरवने विमानतळात प्रवेश करून पत्रकारांच्या प्रश्नापासून आपला पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न केला.