20 वर्षात 1 हजार 211 प्रकल्प; श्रीपाद नाईक यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध

0
690
गोवा खबर: 1999 पासून 2019 पर्यंत सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांनी 20 वर्षात 1 हजार 211 प्रकल्प पूर्ण करून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.नाईक यांनी नुकताच आपला कार्य अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात 20 वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध कामांचा आढावा घेत,विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
1999 मध्ये पहिल्यांदा खासदार बनल्या नंतर 2004 पर्यंत नाईक यांनी 240 प्रकल्प हाती घेऊन मार्गी लावले.2004 मध्ये पहिल्या टर्म मध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर नाईक दुसऱ्यांदा निवडून आले.2004 ते 2009 या कालावधीत नाईक यांनी आपल्या कामाचा सपाटा कायम ठेवत तब्बल 356 प्रकल्प हाती घेऊन पुर्णत्वास नेले.15 व्या लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या नंतर 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी 293 प्रकल्प मार्गी लावले.
आताच्या 2014 ते 2019 च्या कालावधीत त्यांनी तिनशेचा आकडा पार करत 322 प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केले.
14 व्या लोकसभेच्या कालावधी मध्ये देशातील 545 लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या कामाचा आढावा इंडिया टुडेने घेतला होता त्यात उत्तर गोव्याचा नंबर 31 वा लागला होता.
श्रीपाद नाईक यांनी आपल्या खासदार निधी मधून आणि केंद्र सरकारच्या योजना राबवून मतदारसंघाचा नेहमीच विकास साधला आहे.15 व्या लोकसभेत इंडियन एक्सप्रेसने देशातील 547 मतदारसंघाचा आढावा घेतला त्यात उत्तर गोव्याचा नंबर 11 वा लागला होता.
16व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या नंतर नाईक यांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत 322 प्रकल्प हाती घेतले.त्यातील 217 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.38प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.67प्रकल्पा बाबत कागदोपत्री प्रक्रिया सुरु आहे.
श्रीपाद नाईक यांनी 20 वर्षात शेकडो कोटी रुपयांचे 1 हजार 211 प्रकल्प पूर्ण करून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या विकासात सिंहाचे योगदान दिले असल्याने त्यांचा विजय यावेळी निश्चित आहे,असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे.