सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार 

0
1740

गोवा खबर:येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद राहणार असल्याच्या अफवा विविध समाजमाध्यमातून फिरत असल्यामुळे जनसामान्यांमध्ये विनाकारण गोंधळ निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार असून बँकिंग व्यवहार नियमित सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन सप्टेंबरला रविवार तर 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे तर 3 सप्टेंबरला ज्या राज्यात सुट्टी जाहीर झाली आहे अशा काही राज्यातच बँकांना सुट्टी राहील असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

या दिवशीही सर्व राज्यातली एटीएम पूर्णत: कार्यरत राहतील आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहार करता येतील. एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवावी अशा सूचना बँकांना करण्यात आल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्टया वगळता इतर दिवशी बँकांचे कामकाज सुरु राहील.