15 मार्च नंतर खाणी सुरु रहाव्यात यासाठी खाण अवलंबीत आक्रमक

0
867

गोवाखबर:सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर तोडगा काढून खाणी 15 मार्च नंतर देखील सुरु राहतील याची खबरदारी घ्यावी आणि लीलावाची प्रक्रिया सुरु करताना विशेष तरतूद करून कोणत्याही परिस्थिती मध्ये खाणी सुरु ठेवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर केंद्रीय खाण मंत्री तोमर आणि नितीन गडकरी यांना गोव्यात आणून गोव्यावर ओढवलेल्या गंभीर संकटाची त्यांना कल्पना द्या,अशी मागणी आमदार नीलेश काब्राल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कॅबिनेट सल्लागार समितीकडे केली.खाणींचा लिलाव करण्यास आमची हरकत नाही.दरम्यानच्या काळात  सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गडकरी आणि तोमर यांना गोव्यात आणून इथल्या समस्या त्यांच्या कानावर घालू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक उद्या सकाळी 11 वाजता भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे.बांधकाममंत्री ढवळीकर देखील आज रात्री आणि उद्या गडकरी यांना भेटून खाण अवलंबीतांच्या समस्या त्यांच्या कानावर घालणार आहेत.

15 मार्चपासून खाणीवरील सर्व उपक्रम पूर्णपणे बंद होणार असल्याने सध्या राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो, आमदार नीलेश काब्राल, सभापती प्रमोद सावंत व भाजपच्या अन्य काही नेत्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याचबरोबर भाजपच्या राज्यातील तिन्ही खासदारांनी केंद्राकडे समस्या मांडावी यासाठीही जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र ही भेटसुद्धा अल्प काळाची होती. या भेटीत कोणतेही ठोस आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले नाही. त्यामुळे हे शिष्टमंडळ हात हलवत परतले.