इलाईट मॉडेल लुक इंडिया २०१७ गोवा विभागीय फेरी संपन्न

0
1107

देशातील सर्वांत मोठा फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स आणि जागतिक पातळीवरील टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या इलाईट यांच्या वतीने जगातील सर्वांत लोकप्रिय व उत्सुकता ताणून धरणाऱ्या उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘इलाईट मॉडेल लुक इंडिया २०१७’ची यंदा चौथ्या एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर लोकप्रियता, सन्मान आणि नवी ओळख निर्माण करून देणारा असा हा उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपर मॉडेल बनण्याचे आणि सिंडी क्रॉफर्ड, स्टेफनी सेयमूर, गिसले बंड्शेन,सिग्रिद अग्रेन, कोन्स्टान्स जबलोन्स्की अशी जगप्रसिद्भ मॉडेलच्या पंगतीत बसण्याचे स्वप्न असलेल्या हजारो युवक-युवतींसाठी ही जीवनातील एक सर्वोत्तम संधी देणारी स्पर्धा ठरली आहे.यंदा भारतात इलाईट मॉडेल लुक इंडियाची स्पर्धा सात शहरांत आयोजित करण्यात आली असून शनिवारी, २९ ऑगस्ट २०१७ रोजी गोव्यात प्राथमिक विभागीय फेरी होत आहे. मॉल डि गोवा मध्ये ही गोवा विभागीय फेरी पार पडली. या स्पर्धेच्या
परीक्षकांमध्ये सुपरमॉडेल, फॅशन दिग्दर्शक आणि इलाइट मॉडेल लुक इंडियाचे परवानाधारक मार्क रॉबिन्सन, सुपरमॉडेल
दियान्द्रा सुआरिस आणि अभिनेत्री व सुपरमॉडेल पिया त्रिवेदी यांचा समावेश आहे.
या निवड फेरीनंतर 5 या युवतींनी आणि 4 या युवकांनी पुढील फेरीसाठी म्हणजेच मुंबईमध्ये ३० ऑगस्ट २०१७ रोजी होत
असलेल्या इलाइट मॉडेल लुकच्या राष्ट्रीय फेरीसाठी निवड झाल्याने त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्यास एक पाऊल पुढे टाकले आहे. रॅम्पवॉक, फोटोजेनिक क्वालिटी, व्यक्तिमत्त्व, सौंदर्य तसेच सध्याच्या फॅशन ट्रेंडचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आदी गुणांच्या आधारे हजारो स्पर्धकांमधून या मॉडेलची निवड केली गेली. गोव्यातून निवडण्यात आलेले लकी स्पर्धक असे :Girls –Shannon Gonsalves, Sadiya Khan, Ritika C. N., Malaika D'Mello and Luanna Fernandes. Boys –Kavya Gour, Vinay Siwach, Rohun Gurbaxami and Kenneth Alvares. हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकता, पुणे, मुंबई येथे आयोजित विभागीय फेऱ्यांमधील विजेत्यांसमवेत गोव्यातून निवडलेले हे स्पर्धक राष्ट्रीय फेरी जिंकण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. नॅशनल कास्टिंग फेरीनंतर, २९ सप्टेंबर २०१७ रोजी गोव्यात होणाऱ्या अंतिम राष्ट्रीय फेरीसाठी इलाईट मॉडेल लुक परीक्षण पथकाद्वारे स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय विजेता मॉडेलला इलाईट मॉडेल लुक वर्ल्डमध्ये स्थान मिळणार असून तसेच इलाईट एजन्सी समवेत दोन वर्षांचा कराराची हमीही मिळणार आहे.