12 मार्च रोजी 43 वी विभागीय डाक अदालत

0
303

गोवा खबर:टपाल खात्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 12 मार्च रोजी विभागीय डाक डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग,  पणजी  यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही डाक अदालत होणार आहे. गोवा विभागातल्या ज्या तक्रारींचे निराकरण गेल्या सहा महिन्यात झाले नाही, अशा टपालविषयक तक्रारी-गाऱ्हाणी या डाक अदालतीमधे समाविष्ट करण्यात येतील. स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड/अनरजिस्टर्ड टपाल, बचत खाती, मनी ऑर्डरचे पैसे न मिळणे यासारख्या तक्रारींचा यात विचार करण्यात येईल.

तक्रारदाराने, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे केली होती, त्याचे नाव, पद, मनी ऑर्डर/सेव्हींग बँक खाते क्रमांक  इत्यादी माहिती तक्रारीत नमूद करावी. तक्रारदारांनी 05 मार्च 2020 पूर्वी जी. राजेश सचिव,  डाक अदालत व सहायक संचालक, टपाल सेवा, पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी येथील कार्यालयात पाठवाव्यात असे टपाल खात्याच्या पत्रकात म्हटले आहे.