11 फूटी मगर भरवस्तीत आल्याने सावईवेरेत घबराट

0
954
गोवा खबर:फोंडा तालुक्यातील सावईवेरे बाजारा जवळील अनंत मंदिरा शेजारून वाहणाऱ्या ओहळात आज सकाळी तब्बल 11 फुट लांब आणि 400 किलो वजनाची भली मोठी मगर दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये घबराहट निर्माण झाली.प्राणी मित्रांनी तिच्या मुसक्या आवळून तीला वन खात्याकडे सुपुर्द केल्या नंतर स्थानिकांचा भांडयात पडला.
कोठंबी येथून वाहणाऱ्या मांडवी नदीत मोठ्या मगरींचे नेहमीच वास्तव्य असते.याच नदीला जोडून एक ओहळ कांगवाळी येथून सावईवेरेच्या दिशेने वाहतो.
जोरदार पावसामुळे ओहळातील वाढलेल्या पाण्या सोबत तब्बल 11 फूटी मगर सावईवेरेत पाहुणी म्हणून दाखल झाली.बाजारपेठेतील अनंत मंदिरा शेजारुन वाहणाऱ्या ओहळात सकाळी 7 च्या सुमारास काही विद्यार्थ्यांच्या नजरेस ही मगर पडली.बघता बघता खबर गावभर पसरली आणि मगरीला पाहण्यासाठी ओहळाकाठी एकच गर्दी झाली.
प्रत्यक्षदर्शी देवदत्त वेरेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार,गावातील ओहळात भली मोठी मगर आल्याची खबर यतिन नाईक यांना समजताच त्यांनी केरी येथील प्राणीमित्र चरण देसाई यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. लागलीच चरण देसाई आल्या सहकाऱ्यां सोबत मगर पकडण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन सावईवेरेत दाखल झाले.
सकाळी साडे आठ वाजता देसाई घटनास्थळावर दाखल झाले.त्यांतर मगर पकडाची कवायत सुरु झाली.दुपारी 12 वाजे पर्यंत ही कवायत सुरु होती.शेवटी मगरीच्या मुसक्या आवळण्यात देसाई आणि सहकाऱ्यांना यश आले.नंतर ही मगर वन खात्याकडे सुपुर्द करण्यात आली.मगर पकडल्या नंतर सावईवेरेकरांचा जीव भांडयात पडला.