घरोघरी प्रचार आणि छोट्या बैठकांवर पर्रिकरांचा भर

0
744

मुख्यमंत्री तथा पणजी मतदारसंघातून भाजपतर्फे पोटनिवडणूक लढवत असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी मतदारांच्या घराघरात जाऊन भेटीगाठी घेण्या बरोबर छोट्या बैठका आणि कोपरा सभांवर भर दिला आहे.पर्रिकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी पर्रिकर विक्रमी मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केला आहे.प्रचाराच्या माध्यमातून पणजीच्या विकासाचा अजेंडा मतदारांपर्यन्त पोचवला जात असून पर्रिकर यांच्या नेतृत्वावर सगळ्याचा विश्वास असल्याने केवळ औपचारीकता म्हणून ही निवडणूक बाकी असून जनतेला निकाल काय लागणार याची पूर्ण कल्पना असल्याचे नगरसेवक  पुंडलिक राऊत देसाई  यांनी  सांगितले.पर्रिकर यांनी आज अल्तीनो येथील सरकारी वसाहती मध्ये कोपरा सभा घेऊन पणजीच्या विकसासाठी सर्वकाही करणार असून लोकांचा विश्वास असल्याने मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपसभापती मायकल लोबो,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.