1 हजार 345 किलोचा केक बनवून गोव्यात झाला वर्ल्ड रेकॉर्ड

0
1024
गोवा खबर:300 किलो sponge…255 किलो refined flour…200 किलो डार्क चॉकलेट आणि चिप्स..105 किलो salted butter…100 किलो साखर…200 अंडी..60 किलो चेरी..50 किलो काजुगर..30 किलो फ्रेश क्रीम…12 किलो बिस्किट्स…5 किलो पुदीन्याची पाने आणि इतर साहित्य वापरून तब्बल 8 तास खास बनवलेल्या मोल्ड मध्ये बेक करून 1 किलो 345 किलोचा भला मोठा केक बनवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवत ट्रिनिटी ग्रुपने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपली दावेदारी निश्चित केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आता पर्यंत 500 किलोच्या केकच्या रेकॉर्डची नोंद आहे…ट्रिनिटी ग्रुपने 1345 किलोचा केक बनावत नवीन विश्व विक्रम प्रस्थापीत केला…
ट्रिनिटी ग्रुपने गेल्या वर्षी 300 किलोची Fish Patty बनवून गिनीज बुक मध्ये नोंद करवून घेतली होती…यंदा सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार यांच्या नेतृत्वाखाली 1345 किलोचा केक बनवून ट्रिनिटी ग्रुपने नवीन विक्रम प्रस्थापीत केला… वरुण इनामदार यांच्या नेतृत्वाखाली 8 सीनियर शेफ आणि त्यांच्या टीमने काल सायंकाळी साडे सातच्या सुमारास केक बनवण्यास सुरुवात केली… तब्बल 8 तास अथक मेहनत घेतल्या नंतर पहाटे 3 च्या सुमारास केक बनवून तयार झाला…आज दुपारी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून वर्ल्ड रेकॉर्डचा आनंद साजरा करण्यात आला…
हा केक गरीब लोक, अनाथाश्रम,वृद्धाश्रम यांना सांगोल्डा येथील फूड बँकेतर्फे वाटुन त्याचा आनंद साजरा केला जाणार असल्याची माहिती ट्रिनिटी ग्रुपचे प्रमुख जोसेफ डायस यांनी दिली.केंद्रीय आयुष मंत्री नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.