​​भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केल्या पिकं आणि भाजीपाल्याच्या नव्या संकरित जाती

0
1051

गोवाखबर:देशातली अग्रणी अणु विज्ञान संस्थाभाभा अणु संशोधन केंद्राने किरणोत्सर्गाचा वापर करून संकरित बियाणांपासून धान्य आणि भाजीपाल्याच्या नव्या जाती विकसित केल्या आहेत. तुर्भे-रायपूर तांदूळ (टीआरआर1), तुर्भे-कोकण कोलम (टीकेकेआर13) अशा तांदळाच्या नव्या दोन संकरित जाती विकसित केल्या आहेत. चवळीचे तुर्भे-चवळी 901 (टीसी-901) हे वाण विकसित केले आहे. याशिवाय शेंगदाणामोहरीचवळीकाळे चणेहिरवे चणेसोयाबीनतांदूळ आणि गव्हाच्या संकरित बियाणांपासून नवे वाण विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. या नव्या बियाणांमुळे जास्त पिक येण्यास मदत होईल. तसेच कमी वेळेत उत्तम गुणवत्तेचे धान्य पिकवता येईल. कृषी संस्था आणि शेतकऱ्यांकडून बीएआरसीने विकसित केलेल्या धान्य आणि भाजीपाल्याच्या संकरित बियाणांना मोठी मागणी असते. राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून या बियाणांचा प्रसार आणि प्रचार केला जातोअशी माहिती केंद्रीय अणु ऊर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली.