ॲमेझॉन अलेक्सा स्मार्ट स्पीकर्स वर फ्लॅश ब्रिफिंग स्कीलची इफ्फी 2018 मधे सुरुवात सिनेप्रेमी, चित्रपट अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा उपक्रम

0
2115

 गोवा खबर:जगभरातले 390 दशलक्ष लोक आवाजावर आधारित संपर्क माध्यमाचा वापर करत असून येत्या तीन वर्षात ही संख्या तिप्पट होऊन 1.83 अब्जावर पोहोचणार आहे. या माध्यमाचा वापर करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या इफ्फी 2018 मधे ॲमेझॉन ॲलेक्सावर फ्लॅश ब्रिफिंग स्कीलचे उद्‌घाटन झाले. याचा वापर करुन श्रोते आता इफ्फीच्या ताज्या घडामोडीविषयी जाणून घेऊ शकतात. इफ्फी 2018 मधल्या घडामोडी वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील.

या उपक्रमामुळे पत्र सूचना कार्यालयाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त मंच प्राप्त झाला आहे. जनहिताची माहिती , माहिती पत्रके, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला यामुळे जोड मिळणार आहे.

ॲलेक्सा युझर्स https://www.amazon.in/Press-Information-Bureau/dp/B07KK373TD वर जाऊन स्कीलसाठी स्पीकर्स सक्षम करु शकतात. स्पीकर स्वीच ऑन करुन अलेक्सा, व्हॉट इज इन न्यूज अशी विचारणा केल्यानंतर अलेक्सा, इफ्फी 2018 च्या ताज्या घडामोडी देईल.