ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्‌स ॲण्ड सायन्सेसचे माजी अध्यक्ष जॉन बेली आंतरराष्ट्रीय ज्युरीचे प्रमुख

0
934

गोल्डन पिकॉक पुरस्कारासाठी 20 देशांचे 15 चित्रपट स्पर्धेत

माय घाट : क्राइम नंबर 103/2005 आणि जल्लीकट्टू हे भारतीय चित्रपटही स्पर्धेत

 

गोवा खबर:सिनेमॅटोग्राफर आणि ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्‌स ॲण्ड सायन्सेसचे माजी अध्यक्ष जॉन बेली 50 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या प्रमुख पदी असतील. फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉबिन कॉम्पिलो, चीनी दिग्दर्शक छांग यांग आणि लिन रामसे हे चित्रपट निवड समितीतील सहसदस्य असतील. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी एकमेव भारतीय आहेत.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, प्रतिष्ठेच्या गोल्डन पिकॉक पुरस्कारासाठी 20 देशांच्या 15 चित्रपटांमध्ये चुरस असेल. एकूण 700 प्रवेशिकांमधून हे 15 चित्रपट निवडण्यात आले आहेत.

 

पेमा त्सेदनचा ‘बलून’ (चीन), अली आदिनचा ‘क्रोनोलॉजी’ (तुर्की), आंद्रेस होर्वाथचा ‘लिलियन’ (ऑस्ट्रिया), वॅग्नेर मौराचा ‘मेरीघेला’ (ब्राझील), हन्‍स पिटर मोलान्दचा ‘आऊट स्टीलिंग हॉर्सेस’ (नॉर्वे | स्वीडन | डेन्मार्क), ब्लेझ हॅरिसनचा ‘पार्टीकल्स’ (फ्रान्स | स्वित्झर्लंड), ग्रेगोर बोझिकचा ‘स्टोरीज फ्रॉम द चेस्टनट वुड्स’ (स्लोव्हेनिया), योसेप एन्गी नोएनचा ‘द सायन्स ऑफ फिक्शन्स’ (इंडोनेशिया | मलेशिया | फ्रान्स), एर्डेनेबिलेग गॅनबॉल्डचा ‘स्टीड’ (मंगोलिया), क्रिस्टॉफ डीक यांचा ‘कॅप्टिव्ह्ज’ (हन्‍गेरियन) आणि बेन रेखीचा ‘वॉच लिस्ट’ (फिलिपिन्स) या स्पर्धेत आहेत.

स्पर्धा विभागात महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये सोफी डेरास्पेचा ‘अँटिगॉन’ आणि महनाज मोहम्मदीचा ‘सन-मदर’ यांचा समावेश आहे. अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माय घाट: क्राइम नंबर 103/2005’ हा मराठी चित्रपट आणि लिजो पेलिसरी दिग्दर्शित ‘जल्लीकट्टू’ हा मल्याळम चित्रपट यंदाच्या इफ्फी महोत्सवात भारताकडून स्पर्धेत भाग घेणार आहे.