८ ऑक्टोबर रोजी शालांत पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

0
274

 

गोवा खबर: पर्वरीतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत ११ परीक्षा केंद्रामधून घेतलेल्या शालांत पुरवणी परीक्षेचा निकाल उध्या ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

     निकालाची यादी संबंधित शाळांनी ८ ऑक्टोबर रोजी डाऊनलोड करून घ्यावी. १० ऑक्टोबरपासून शाळांमध्ये गुण पत्रिका उपलब्ध करण्यात येईल.

 www.gbshse.net या संकेतस्थळावर विध्यार्थ्यांसाठी निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. मंडळाच्या संकेत स्थळावरही निकालाची पुस्तिका उपलब्ध करण्यात येईल.