७ मार्च रोजी ऑडॅक्स इंडियातर्फे महिलांच्या २ ऱ्या २०० किमी बीआरएम सायकल राईडचे आयोजन 

0
216
गोवा खबर : येथील ट्राय गोवा फौंडेशनतर्फे रविवार दिनांक ७ मार्च रोजी महिलांच्या २ ऱ्या २०० किमी बीआरएम सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत बुधवारी ट्राय गोवतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगितले आहे की महिलांना सायकलिंग क्षेत्रात येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी २०२० मध्ये ऑडॅक्स इंडिया महिला क्लब स्थापन करण्यात आला होता.  या क्लबतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२० रोजी पहिल्या राईडचे आयोजन करण्यात आले होते. या १०० आणि २०० किमीच्या राईडमध्ये संपूर्ण देशभरातील महिला सहभागी झाल्या होत्या.
याबाबत बोलताना ट्राय गोवा फौंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा म्हणाले की या राईडमध्ये पुरुष देखील सहभागी होऊ शकतात मात्र त्यांच्यासोबत महिला सायकलस्वार असणे आवश्यक आहे.
याबाबत बोलताना ऑडॅक्स इंडिया महिला क्लबच्या संस्थापक दिव्या ताटे म्हणाल्या की “मागच्या वर्षी झालेल्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद लाभला होता ,मागील वर्षी संपूर्ण भारतातुन महिला सायकलस्वार या राईडसाठी गोव्यात आल्या व त्यांनी येथील स्थानिक महिलांसोबत राईड केली.”
पर्वरी येथील सुपर रंडोननेउर सायकलिस्ट असलेल्या अनुराधा गुगलानी म्हणाल्या की मागच्या वर्षी झालेली राईड ही खूपच खास होती कारण या राईडमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट महिला सायकलपटुंनी येथे येऊन गोव्यातील महिला सायकलपटूंसोबत राईड केली होती.या राईडमुळे गोव्यात महिला सायकलपटुंच्या संख्येत वाढ झाली.”
मल्होत्रा म्हणाले की १०० आणि २०० किमीची ऑडॅक्स इंडिया महिला राईड बाणावली येथील ट्रीनीटी समुद्र किनाऱ्यावरून सुरू होईल व येथेच संपेल.राईडमध्ये महिला सायकलस्वारांना भगवान महावीर आणि नेत्रावळी वन्यजीव अभयारण्यातुन प्रवास करावा लागेल. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ५० किमीच्या विशेष राईडचेही आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी खालील ई-मेल अथवा मोबाईलवर संपर्क साधावा
ई-मेल :  trigoarandonneurs@gmail.com
व्हाट्सएप क्रमांक : +91 7447724744