७०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचं ‘डुडल’

0
2808

७०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलनं ‘डुडल’च्या माध्यमातून भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलमध्ये भारतीय संसद, अशोक चक्र ,देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर यांचा वापर करण्यात आला आहे. हे डुडल साकारताना तिरंग्याच्या रंगांचा चपखल वापर करण्यात आला आहे.मागील वर्षी, म्हणजेच २०१६मध्ये गुगलनं भारतीय संसदेच्या स्वरूपातील डुडल साकारत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.२०१५मध्ये गुगलनं दांडी यात्रेचं रेखाचित्र असलेलं कल्पक डुडल साकारलं होतं.२०१४ मध्ये गुगलच्या नावात पोस्टकार्डचा नेमकेपणानं वापर करण्यात आला होता.भारतीय ध्वजातील तीन रंगांच्या मदतीनं डुडल साकारून गुगलनं ६७वा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.