६९ वा वन्यजीव सप्ताह संपन्न

0
330

 

गोवा खबर: गोवा वन खात्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकांच्या आणि इतर संबंधितांच्या सहभागाने वन्यजीव सप्ताह साजरा केला. यानिमित्ताने मोरजी समुद्र किनारा आणि मोरजी समुद्र टर्टल ट्रस्टच्य़ा सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली.

     कचरा आणि प्लास्टीक टाकल्याने सागरी आणि किनारपट्टी जीवनास आणि विशेषतः सागरी कासवाना धोका निर्माण होतो त्यासंबंधी जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

     संपूर्ण समुद्रकिना-याची साफसफाई करण्यात आली असून प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला आणि तो साळगांव कचरा प्रक्रिया प्रकल्पात देण्यात येणार आहे.

     निसर्ग प्रेमी, विध्यार्थी, गावकरी, मोरजी समुद्रकिनारा टर्टल ट्रस्ट आणि दृष्टी व वनखात्याचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

     वनप्रमुख आयएफएस श्री सौरभ कुमार, सरपंचा श्रीमती वैशाली शेटगांवकर, उपसरपंच श्री अमित शेटगांवकर, श्री तुषार शेटगांवकर आणि इतर पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.

     नागरिकांनी आपल्या कच-याची योग्यपध्दतीने विल्हेवाट लावण्याचे वन खात्याने सांगितले.