५८ सायकलिस्टनी पूर्ण केली ट्राय गोवाच्या सिझनची पहिली २०० किमी बीआरएम राईड

0
325

ऍडलीन मास्कारेनस २०० किमी पूर्ण करणारी एकमेव स्त्री ठरली

 गोवा खबर : ५८ इंडयुरन्स सायकलिस्टनी ट्राय गोवाची पहिली अधिकृत २०० किमी ब्रिवेट रँडोनुअर मॉंडीएक्स (बीआरएम) राईड पूर्ण केली,२०२० -२१ या सिझनची ही पहिली राईड रविवार २२ नोव्हेंबर २०२० ला झाली.


दक्षिण गोव्याच्या कामुर्ली येथील ऍडलीन मास्कारेनस यांनी १३ तास आणि ३० मिनिटांच्या आत ही राईड पूर्ण केली. ही राईड पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव महिला रायडर ठरल्या.


याबाबत बोलताना दोन मुलांची आई असणाऱ्या चाळीस वर्षीय अडलीन म्हणाल्या “ही माझी २०० किमीची तिसरी राईड आहे.मला ३००,४०० आणि ६०० किमी पूर्ण करून सुपर रँडोनुअर ही पदवी मिळवायची आहे.संपूर्ण भारतातील आज्या या राईडमध्ये सहभागी होत असताना गोव्यातील स्त्रिया मागे का पडतात?”

२०० किमीच्या राईड सोबतच या इव्हेंटमध्ये दहा सायकलिस्टनी ट्राय गोवा १०० किमी ब्रिवेट राईड पूर्ण केली.यात तीन स्त्रियांचा समावेश आहे.यामध्ये रिबेका जॉर्ज, मेगन फर्नाडिस आणि मिका फर्नांडीस यांचा समावेश आहे.


याबाबत बोलताना ट्राय गोवा फौंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा म्हणले की चार महिला सायकलिस्टनी त्यांच्या राईड पूर्ण केल्यामुळे आम्ही आनंदी झालो आहोत. यामुळे ट्राय गोवाच्या येणाऱ्या इव्हेंटमध्ये अधिकाधिक महिला सहभागी होण्यास प्रवृत्त होतील.” ट्राय गोवा हा औडक्स इंडिया रँडोनुअर (AIR)आणि औडक्स क्लब पर्शियनशी(ACP) संलग्नित क्लब आहे.
यातील २०० किमीच्या राईडला ‘ट्राय गोवा कोस्टलाईन बीआरएम’ असे म्हणले जाते यामध्ये सायकलिस्ट दक्षिण गोव्याच्या किनारी भागातून राईड करत माजोर्डा,कोलवा,बाणावली,कोला,अगोंद आणि पोळे मार्गे परत मडगाव,बोरी आणि ओल्ड गोवा असा प्रवास करतात.२०० किमी पूर्ण केलेल्या सर्व यशस्वी सायकलिस्टना फ्रान्स येथील औडक्स क्लब पर्शियन कडून विशेष मेडल आणि प्रशस्तीपत्रक मिळेल.


रंडोननेउरिंग म्हणजे लांब पल्ल्याच्या सायकल राईड आहेत यामध्ये २००,३००,४००,६०० आणि १००० किमी राईडचा समावेश होतो.यांनाच ब्रिव्हेट दे रंडोननेउर मॉंडीएक्स असे म्हणतात. फ्रान्समधील औडक्स क्लब परिसिएन ही रँडोनुअरवर देखरेख ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.रायडिंगची ही पद्धत ही स्पर्धात्मक नसते तसेच ती नेहमीच स्वयं सहाय्यक असते.

मल्होत्रा यांच्या मते १०० किमीची ट्राय गोवा पॉप्युलर आयोजित करण्याचे कारण म्हणजे यामुळे नवीन इंडयुरन्स सायकलिस्टना मोठया पल्ल्याच्या राईडचा अनुभव यावा तसेच या राईडमध्ये सहभागी होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता आयोजित करण्यात येते. ही १०० किमीची राईड पूर्ण केल्यावर औडक्स इंडिया रँडोनुअर्स कडून मेडल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येते.