५व्या कोमो इंडिया बीच फॅशन वीकला गोव्यात सुरुवात

0
876

गोवा मेरियॉट रिसॉर्ट अँड स्पामध्ये २६ ते २९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान आयोजन
पणजी:जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यामध्ये पाचव्या ‘कोमो इंडिया बीच फॅशन वीक’ सादर करताना आम्हाला आभिमान वाटत आहे. यामध्ये विक्रम फडणीस, आनंद काबरा, पल्लवी जयकिशन, रॉकी एस. असे नामांकित डिझायनर आपले कलेक्शन सादर करणार आहेत.
रोमेडी नाऊ साठी विकसित केलेल्या व रोमान्स, आनंद व आनंदाचे प्रतिबिंब झळकणाऱ्या कलेक्शनचा आधार घेत केन फर्न्स ‘लव्ह, लाफ, लिव’ या विचारधारेविषयी बोलतात. भारतातील लोकप्रिय मुव्ही चॅनेल असलेली रोमेडी नाऊ ही वाहिनी आता फॅशनच्या दुनियेतही प्रवेश करत असून ‘लव्ह, लाफ, लिव’ या संकल्पनेवर आधारित आपले पहिले कलेक्शन सादर करत आहे. या खास वस्त्रप्रावरणांच्या श्रेणीसाठी या वाहिनेने लोकप्रिय टेलिव्हिजन डिझायनर केन फर्न्स यांचे सहकार्य घेतले असून त्यांनी विकसित केलेले स्टायलिश कलेक्शन इंडिया बीच फॅशन वीक २०१७मध्ये सादर केले जाणार आहे.
लख्ख प्रकाशमय दिवस, लाली फुललेले गाल आणि प्रेमाचा रंग याचे प्रतिबिंब झळकणाऱ्या या कलेक्शनच्या माध्यमातून रोमेडी नाऊद्वारे रोमँटिक स्पर्श, प्रेम आणि आनंदाची अनुभूती विखुरली जात आहे. हे स्टायलिश पण सभ्य वाटणारे कलेक्शन सेलिब्रिटी शो-स्टॉपर, अभिनेत्री व मॉडेल गोहर खान सादर करणार आहे. आकर्षक फ्रिल आणि पिवळे व पांढरे पॉप प्रेक्षकांना नक्कीच खूश करतील अशी आशा आहे. तेव्हा हास्य परिधान करणाऱ्या या कलेक्शनला आपली पावती मिळेल असा विश्र्वास आहे.
भावना पांड्ये, नंदिता माहतानी व डॉली सिधवानी यांचे ‘लव जेन’ हे रिफ्रेशिंग लेबल आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात कांपाल-पणजी-गोवा येथे सुरू होत असलेले कोमो हे डिझायनर्स कलेक्टिव यांनीही फॅशनप्रेमींची उत्सुकता वाढवली आहे.
या कार्यक्रमात पहिले दान सुरू होत आहे. या दालनामध्ये जगभरातील डिझानयरद्वारा फॅशनप्रेमी पुरुष व महिलांसाठी विकसित स्विम, रिसॉर्ट, कॉकटेल, लक्झरी पेट कलेक्शन सादर केले जाणार आहे. फॅशनप्रेमी व ग्राहकांवर मोहिनी टाकण्यास सज्ज झाले आहे. नामांकित डिझायनरनी विकसित केलेल्या एकमेव बीच आणि रिसॉर्ट वेअर कलेक्शनच्या सादरीकरणासाठी हा उपक्रम एक समर्पक व्यासपीठ ठरणार आहे.
कोमो मध्ये जगभरातील डिझानयरद्वारा फॅशनप्रेमी पुरुष व महिलांसाठी विकसित स्विम, रिसॉर्ट, कॉकटेल, लक्झरी पेट कलेक्शन सादर केले जाणार आहे. रॉकी एस, अनुपमा दयाल, मनोविराज खोसला आधी नामांकित डिझायनरची जादू या पाचव्या इंडिया बीच फॅशन वीकमध्ये कोमो कलेक्टिवच्या माध्यमातून झळकणार असून कोमोच्या विचारधारेचे दर्शन घडविणारा हा एक दमदार कार्यक्रम ठरणार आहे.
जागतिक दर्जाच्या डीजेंसह कोरोन संडओनर्स, कला दालन तसेच पॉप-अप् स्टोअर अशी शॉपिंगप्रेमींसाठी या महोत्सवात अतिरिक्त आकर्षणे असणार आहेत.
कोमो इंडिया बीच फॅशन वीकमध्ये सहभागासाठी आतुर झालेले आनंद काबरा, अनुपमा दयाल, केन फर्न्स सह पल्लव ओझा हे प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोवर आपल्या कलेक्शनची माहिती देणार आहेत, तसेच कोमोचेही अनावरण करणार आहेत.
एकूणच या तीन दिवसीय उपक्रमात जागतिक दर्जाच्या फॅशन, संगीत, नेटवर्किंग व मनोरंजनाची रेलचेल असेल. आयबीएफडब्लूमध्ये आम्ही फॅशनला गंभीरपणे घेतोच, पण आयसी लेमनेडप्रमाणे आम्हाला ही फॅशन हवी असते.
या उपक्रमाची माहिती देताना चीफ इनोवेटिव्ह ऑफिसर व सहसंस्थापक पल्लव ओझा म्हणाले, “आमचे प्रमुख डिझायनर व सहकारी ब्रँड यांच्या सहकार्याने पाचव्या इंडिया बीच फॅशन वीकची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आमच्या प्रयत्नांद्वारे वस्त्रप्रावरणांच्या उद्योगक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येतील असा आम्हाला विश्र्वास आहे. या क्षेत्रातील उत्पादनांच्या मूल्यनिर्मितीवर आमचा नेहमीच भर राहिला आहे. एकूणच आयबीएफडब्लूचा पाचवा सीझन म्हणजे भव्य फॅशन शो, संस्मरणीय व तरल अनुभव ठरणार आहे.”