३१ सायकलिस्टनी ट्राय गोवाची ४०० किमी बीआरएम सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण

0
346

 

गोवा खबर : ट्राय गोवाने आयोजित केलेली ४०० किमीची ब्रिवेट रँडोनुअर मॉंडीएक्स( बीआरएम )  सायकल राईड एकूण ३१ सायकलिस्टनी २७ तासात पूर्ण केली.

याविषयी माहिती देताना ट्राय गोवा फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य राजेश मल्होत्रा म्हणाले की सायकलिस्टनी या राईडला गोवा मुक्तीदिनी म्हणजेच शनिवार दिनांक १९ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता पणजी येथून सुरू केली.त्यांनी ही राईड पणजी-लोटली-मडगाव-कारवार-कुमठा-होन्नावर येथून परत करमल घाट-केळशी – कासावली -दाबोळी – पणजी यामार्गे २७ तासात पूर्ण केली.

यशस्वी सायकलिस्टना औडक्स क्लब पॅरीसेन ( एसीपी) ,फ्रान्सतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडल व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.ही ब्रिवेट रँडोनुअर मॉंडीएक्स ( बीआरएम ) प्रतिष्ठित सुपर रंडोननेउर टायटलचा तिसरा टप्पा आहे.यामध्ये सायकलिस्टना एका वर्षात २००,३००,४०० आणि ६०० किमीची राईड्स पूर्ण कराव्या लागतात.

ट्राय गोवा क्लब हा फ्रान्समधील औडक्स क्लब पॅरीसेन ( एसीपी) आणि औडक्स इंडिया रंडोननेउर (एआयआर) यांच्यासोबत संलग्नित असून १४०० किमी पर्यंतच्या बीआरएम राईड्सचे आयोजन करते.

रविवार १० जानेवारी २०२१ रोजी बीआरएम २०० किमी आणि ब्रिवेट पॉप्युलैर १०० किमी राईड्सचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी