३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस

0
163

 

 गोवा खबर:दरवर्षी २१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळण्यात येतो. औध्योगिक फसवणुकीतून युवकांचे संरक्षण आणि त्यांना तंबाखू आणि निकोटीन वापरापासून प्रतिबंध करणे अशी या वर्षाची संकल्पना आहे.

 तंबाखू उध्योगाकडून वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग/ब्रॅडिंग करून युवकांना तंबाखू उत्पादनाकडे आकर्षित करण्यात येते. आज तरूणामध्ये ई-सिगरेट, व्हॅपिंग, गरम तंबाखू उत्पादनाकडे कल वाढविलेला दिसून येतो. औध्योगिक अस्थापने ऑनलाईन आणि सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून आपल्या मार्केटिंग स्ट्रेटजीचा विस्तार करीत आहे.

समाजाने तसेच खास करून तरूणांनी अशा फसवणुकीच्या जाहिरातीना भुलून तंबाखूच्या सेवनास बळी पडू नये. प्रत्येक नागरिकांनी आणि पालकांनी आजच्या तरूण पिढीला तंबाखूच्या वाईट परिणाविषयी जागृत करण्याची गरज आहे.

 तंबाखू सेवनामुळे कॅन्सरसारख्या भयानक रोगाना बळी पडून प्रत्येक वर्षी जगात ८ मिलियन लोकांना मृत्यू येतो. आजच्या कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर, मधुमेह, श्वासोच्छवास, आणि हृदयरोगीना कोविड संसर्गाचा जास्त धोका आहे. तंबाखूचे सेवन करणा-या व्यक्तीस तसेच श्वसनासंबंधित अनेक व्याधी असलेल्याने त्यांना कोविडचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. सिगारेट पिताना हात आणि ओठांचा सरळ संपर्क येत असल्याने हाताचे व्हायरस तोंडात जाण्याची जास्त शक्यता असते. सिगरेट पिणा-यास अगोदरच फुफ्फुस, यासारखे रोग असतात तसेच त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे न्युमोनियासारख्या गंभीर रोगाचा धोका वाढतो. कोविड-१९ हा संसर्गजन्य रोग आहे आणि तो जास्त करून फुफ्फुसांवर परिणाम करतो. धुम्रपानामुळे फुफ्फुसे अशक्त होतात आणि कोविडाचा संसर्ग आणि इतर रोगाशी लढा देण्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी पडते.

      धूरविरहीत तंबाखू उत्पादने, पानमसाला आणि सुपारी खाल्याने तोंडात लाळ तयार होते आणि नंतर ही लाळ थुंकली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने कोरोना व्हायरसचा प्रसार होतो आणि त्यासाठी लोकांनी कोविड काळात तंबाखू पदार्थ खाण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. धुम्रपान आणि तंबाखू सेवन करण्याचे व्यसन सोडविण्यासाठी आणि कोविड रोगापासून दूर राहण्याची ही योग्य वेळ आहे.