३१ ऑक्टोबर रोजी प्रयोग सांज    

0
374

                                                         

गोवा खबर:कला आणि संस्कृती खात्यातर्फे गेल्या ७ वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाटो येथील संस्कृती भवनात प्रयोग सांजचे आयोजन करण्यात येते. तथापि कोविड महामारीमुळे फेब्रवारी २०२० पासून त्यात व्यत्यय आला. आता सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी मार्गदर्शक तत्वे जारी केल्याने कला आणि संस्कृती खात्याने ३१ ऑक्टोबर रोजी संध्या ६.३० वाजता संस्कृती भवनात प्रयोग सांजचे आयोजन ट्रायल म्हणून केले आहे.

 विजयकुमार ट्रव्हलिंग बॉक्स थियेटर फोंडाच्यावतीने आत्मशुध्द हे मराठी नाटक एकेरी सादर केले जाईल. या नाटकाची कल्पना, लेखन आणि दिग्दर्शन श्री विजयकुमार यानी केले आहे. कुमारी प्रज्ञा तांडे हे नाट्य सादर करतील. श्री अजय फोंडेकर यांचा रंगमंच, श्री मार्क फर्नांडिस यांची प्रकाश योजना, पार्श्व संगीत श्री आदर्श गोवेकर आणि रंगमंच व्यवस्थापन श्री धिरज नाईक यांचे आहे. ५० ते ६० लोकाना प्रवेश दिला जाईल. सरकारच्या मर्गदर्शक तत्वांचे पालन करून नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा सदर खात्याचा विचार आहे. इच्छुकानी नाट्य सादर करण्यासाठी कला व संस्कृती खात्याकडे संपर्क साधावा.