३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार

0
805

गोवा खबर :अटल ग्राम विकास संस्थेने मडगांव येथील लोहिया मैदानावर ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार २०१९ चे आयोजन केले आहे.

या बाजारात ग्रामीण महिला स्वंय मदत गट भाग घेणार आहेत. ग्रामीण महिलांमध्ये उध्य़ोजकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या बाजाराचे आयोजन केले आहे.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे विरोधी पक्षनेते  दिगंबर व्ही कामत, लोकसभेचे खासदार फ्रांसिस सार्दीन, राज्यसभेचे खासदार  विनय तेंडुलकर आणि सांगेचे आमदार प्रसाद गांवकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बाजाराचे उद्घाटन करतील.