२ नोव्हेंबर रोजी अहोय मरीनासंबंधी जनसुनावणी

0
961
गोवा खबर:नावशी येथील प्रस्तावित मरीना प्रकल्पासंबंधी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २  नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम मध्ये २ नोव्हेंबर रोजी सकाळी  १०.३० वाजता सुरू होणार आहे. सुनावणी संध्याकाळी ७ वाजता संपणार आहे.
या सुनावणीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सकाळी  ९.३० वाजता त्याचदिवशी नोंदणी सुरू होणार आहे.