२५ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये ११०वी डाक अदालत

0
873

गोवा खबर:टपाल खात्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी टपाल विभागाकडून डाक अदालत आयोजित करण्यात येते. टपाल खात्याच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई कार्यालयाने येत्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी ‘११०वी सर्कल लेव्हल डाक अदालत’चे आयोजन केले आहे. मुंबई जीपीओ, दुसरा मजला येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता ही डाक अदालत होणार आहे.

महाराष्ट्र व गोवा विभागातल्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा महिन्यात झाले नाही, अशा टपालविषयक तक्रारी / गाऱ्हाणी या डाक अदालतमधे समाविष्ट करण्यात येतील. स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड, अनरजिस्टर्ड टपाल, बचत खाती, मनीऑर्डरचे पैसे न मिळणे, यासारख्या तक्रारींचा यात विचार करण्यात येईल.

तक्रारदाराने, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे केली होती, त्याचे नाव, पद, मनी ऑर्डर/सेव्हींग बँक खाते इत्यादी माहिती तक्रारीत नमूद करावी. येत्या १० सप्टेंबर २०१९ पूर्वी डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ इमारत, दुसरा मजला, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे टपाल खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. अर्जाचा नमुनाwww.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.