२१ मे पासून शालांत परीक्षा

0
227

 

गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उध्या २१ मे रोजी शालांत परीक्षा घेण्यात येत आहे. ६ जून रोजी ही परीक्षा समाप्त होणार आहे.

     शालांत परीक्षेची संपूर्ण माहिती शिक्षण मंडळाच्या www.gbshse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     सकाळी ९ वाजता सर्व गटातील परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे अगोदर सर्व उमेदवारांनी आपल्या संबंधित परीक्षा केंद्रात हजर रहावे.

     ३० मिनिटांच्या पलीकडे उशीरा पोचलेल्या उमेदवारांना परीक्षेस अपात्र ठरविण्यात येईल. पेपर लिहीण्यासाठी ज्यादा १० मिनिटे देण्यात येतील.

     उमेदवारांनी कोणतीही इलेक्ट्रोनिक गॅजेट सोबत आणू नये आणि प्रवेश कार्ड व मुख्य उत्तर पत्रिकेत छापलेल्या सूचनांचे कठोर पालन करण्याची आवश्यकता आहे. उमेदवारांने केवळ ब्ल्यू बॉल पेन वापरावे आणि आकृत्या काढण्यासाठी ब्लॅक लीड पेन्सिलचा वापर करावा. रंगीत शाईच्या वापरास प्रतिबंध असेल उमेदवारांनी जेल पेनचा वापर करू नये. इतर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     राज्यातील सुमारे २९ केंद्रामध्ये शालांत परीक्षा २०२० घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेला १९६८० विध्यार्थी बसणार आहेत. (९७९० मुले आणि ९८९० मुली आहेत.)

     अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ८४५९७१०१७१/८४५९७१०१७२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.