२०२२ पर्यंत भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ आणि कुशल भारत पाहाणे हे आमचे ध्येय : केंद्रीय मंत्री गीते

0
983

 

पणजी: ‘नया भारत हम करके रहेंगे’ (आम्ही घडवणार नवा भारत) या संकल्पनेवर आधारित भारत सरकार आणि गेल इंडिया लिमिटेड यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या चार दिवसीय कार्यक्रमाचे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक व्यवसाय मंत्री, अनंत गीते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळेस श् श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कारभार), आयुष, भारत सरकार,  विनय डी. तेंडुलकर, खासदार आणि एस. के. श्रीवास्तव, कार्यकारी संचालक आणि व्यस्थापक, गेल इंडिया लिमिटेड हे ही उपस्थित होते.

कचरा, गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद, समाजवाद यांपासून मुक्त ‘नवा भारत’ या संकल्पनेचे महत्त्व मांडण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी श्री. गीते म्हणाले, ‘आज नवा भारत उदयोन्मुख आणि झपाट्याने विकसित होत आहे. २०२२ पर्यंत भारताला कचरा, गरीबी, भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांपासून मुक्त करण्यासाठी शांतता, एकोपा आणि विकासाची गरज आहे. आपण विकासाच्या नव्या युगाकडे जात आहोत आणि हे स्वप्न वास्तवात बदलण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.’
यावेळेस डीएव्हीपीतर्फे भारत छोडो आंदोलनाचा प्रत्येक टप्पा दर्शवणारे फोटो प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते आणि त्यासाठी प्रेक्षक व पाहुण्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात १८५७ ते १९४७ या कालखंडातील स्वातंत्र्य संघर्ष प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला आहे.
नव्या भारताच्या संकल्पनेचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले इतर पैलूही या प्रदर्शनात मांडण्यात येतील. केंद्रीय सरकारच्या विविध उदारमतवादी धोरणांची माहितीही यावेळेस देण्यात येणार आहे.
पाच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी आज प्रदर्शनाला भेट दिली. चित्र प्रदर्शन, साहित्यिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या चार दिवसीय प्रदर्शनात आयोजित केले जाणार आहेत.
हे प्रदर्शन १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान कला अकादमी, पणजी येथे पाहाता येईल.