२०० प्रसिध्द गोमंतकीय पुस्तकाचे प्रकाशन

0
769

गोवा खबर:कला व संस्कृतीमंत्री  गोविंद गावडे यानी पद्मभुषण लक्ष्मण पै यांच्या समवेत गोवा राज्याच्या विकासास आणि देशात तसेच जगभरात गोव्याची ओळख वाढविण्यासाठी योगदान दिलेल्या कला—संस्कृती, नाट्य, तियात्र, क्रिडा, साहित्य, फिल्म, गायन, संगीत, वैद्यकिय व इतर क्षेत्रात २०० प्रसिध्द प्रतिभावंत कर्तुत्वान गोमंतकीयांची चित्रमय ओळख करून देणाऱ्या २०० प्रसिध्द गोमंतकीय पुस्तकाचे प्रकाशन झाले. पाटो पणजीतील संस्कृती भवनात वंदना सेठ यांच्या इष्ठ परिवार आणि साहित्य प्रकाशनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

            यावेळी बोलताना गावडे यानी गोमंतकीयानी आपली प्रतिभा आणि बुध्दिमतेच्या बळावर विविध क्षेत्रात मौल्यवान योगदान दिलेल्या या नामवंत गोमंतकीयांची ओळख पुस्तक रूपात संकलित करणे ही प्रशंसनिय बाब असून राज्य आणि समाजासाठी मोठ्याप्रमाणात योगदान दिलेल्या गोमंतकीयासाठी हे पुस्तक खरी आदरांजली आणि सन्मान ठरेल असे सांगितले.

              युवा पिढीना कठीण परिश्रम घेऊन आपल्या संबंधित क्षेत्रात यशस्वी होण्यास प्रेरणा देणारे हे पुस्तक ठरेल असेही श्री गावडे म्हणाले.

              पुस्तकाचे प्रकाशक  किशोर अर्जुन यानी प्रसिध्द पत्रकार स्वर्गीय वंदना सेठ यांचा हा अपूर्ण प्रकल्प असून त्यांच्या मित्र परिवाराने आदरांजली म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यास पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. इतिहासकार  प्रजल साखरदांडे यानी या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे. या पुस्तकामुळे गोव्यातील विध्यार्थ्याना आणि लोकाना २०० प्रसिध्द गोमंतकीय व्यक्तींची माहिती मिळण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

            या पुस्तकात स्व.  मनोहर पर्रीकर, दयानंद बांदोडकर, किशोर आमोणकर, हेमा सरदेसाई, रघुनाथ माशेलकर, वर्षा उसगांवकर,  श्रीपाद नाईक, प्रतापसिंह राणे, वसंतराव धेंपो, श्रीनिवास धेंपो, दिलीप सरदेसाई, दत्तराज साळगांवकर, शिवानंद साळगांवकर, नताशा पल्ला, शदाब जकाती, मारियो मिरांडा, दयानंद नार्वेकर, ल़ॉर्ना कोर्देरो, दामोदर नाईक, विजय सरदेसाई, आशालता वाबगांवकर, राजदिप सरदेसाई, माथानी साल्ढाना, ईवाना फुर्तादो, सुभाष वेलिंगकर, ब्रुनो कुतिन्हो, व्ही एम साळगांवकर, लता मंगेशकर, आशा भोंसले, एदुआर्द फालेरो, श्री दिगंबर कामत, प्रिन्स जेकब, जॉन डिसिल्वा आणि इतरांचा समावेश आहे.

                यावेळी पद्मभुषण लक्ष्मण पै, डॉ प्रमोद साळगांवकर, क्रिकेटर स्वप्नील अस्नोडकर, फुटबॉलर ब्रम्हानंद शंखवाळकर, माहिती अधिकारी जॉन आगियार, पोलीस उपअधिक्षक  महेश गांवकर, ज्येष्ठ पत्रकार, सुभाष नाईक, क्रिकेटर अंबे पर्वतकर, निवृत्त पोलीस अधिक्षक श्री अँलन डिसा, पणजीचे माजी महापौर सुरेंन्द्र फुर्तादो, लेखिका ज्योती कुंकळकर आणि यश फडते यांचा  गावडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सिध्दी उपाध्ये यानी सूत्रसंचालन केले.  ज्योती कुंकळकर यानी आभार मानले.