१८ जून रोजी गोवा क्रांती दिवस समारंभ

0
221

                      

गोवा खबर: १८ जून रोजी पणजीतील आजाद मैदानावर गोवा क्रांतीदिवस साजरा करण्यात येईल.

१८ जून रोजी सकाळी ८.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले असून राज्यपाल  सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती  राजेश पाटणेकर हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहतील. मंत्रीगण, विरोधी पक्षनेते आणि स्वातंत्र्य सैनिक यावेळी उपस्थित राहतील.

मडगांव येथील लोहिया मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले असून उपमुख्यमंत्री  चंद्रकांत कवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर कला व संस्कृतीमंत्री  गोविंद गावडे फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील.