१८ जून रोजी गोवा क्रांती दिवस समारंभ

0
297

 

 

गोवा खबर:१८ जून रोजी पणजीतील आजाद मैदानावर गोवा क्रांती दिवस साजरा करण्यात येईल.

१८ जून रोजी सकाळी ८.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले असून राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहतील. मुख्य सचिव श्री परिमल राय यावेळी उपस्थित राहतील.

मडगांव येथील लोहिया मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले असून उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत कवळेकर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहतील. तर कला व संस्कृतीमंत्री श्री. गोविंद गावडे फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमास हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहतील.