१७ व्या  थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे  भव्य उद्घाटन

0
1740

१४ ते २० डिसेंबर मध्ये सिटी लाईट सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन …

 गोवाखबर: १७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे. शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ला सिटीलाईट सिनेमा मुंबईयेथे अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले. 

या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपटअभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर श्री.सुधीर नांदगावकर, प्रभात चे सचिव  श्री संतोष पाठारे , दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार ही मंडळी उपस्थितहोती. मृणाल कुळकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात केली.  ‘वेलकम होम’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दर वर्षी प्रमाणे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाद्वारे,  सिनेमा आणि सिनेमा निगडित चळवळी मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनासत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड दिला जातो . हा मानाचा अवॉर्ड मानला जातो . यावर्षी तो फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार यांनात्यांच्या आजवरच्या   सिनेमा आणि सिनेमा निगडित चळवळीमधील कामाचा गौरव म्हणून देण्यात आला .

उदघाटनादरम्यान सांगताना, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी सांगितले   –  ” आशियाई सिनेमा जगात मोठा झाला आहे.महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात होत असलेला हा एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे याचा आम्हाला अभिमान आहे. वेलकम होम आणि इतर तीन मराठीसिनेमे या महोत्सवात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्याचबरोबर आम्ही शासनाचे आभार मानतो कारण शासन मदत करत असल्यामुळे हा महोत्सव सुरू आहे, मात्र खंतएवढीच आहे पहिल्या वर्षी जेवढी मदत मिळत होती तेवढीच मदत सरकारकडून १७व्या वर्षी सुद्धा मिळत आहे त्यामुळे त्यांनी ही मदत थोडीशी तरी वाढवावी कारण यामदतीतून आमचे फेस्टिवल ला जाण्यायेण्याचा खर्च सुद्धा निघत नाही. या वेळी एलआयसी आणि झी टॉकीजने केलेल्या स्पॉन्सरशिपसाठी मी आभार मानतो आणित्यांनी आणि इतर लोकांनी अशीच मदत केली तरच आम्हाला हा महोत्सव दरवर्षी करण्याची हिम्मत येईल. सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृह हाऊसफुल्ल केल्यामुळे मी सर्वांचाआभारी आहे “

 

प्रमूख पाहुण्या मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी यांनी त्या अभिनय करत असलेला वेलकम होम या चित्रपटाची ओपनिंग फिल्मम्हणून निवड केली याबद्दल त्यांनी महोत्सव कार्यकारणी चे आभार मानले.वेलकम होम ची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा कासव आणि “वेलकम होम” चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुखथनकर यांनी सांगितले की, ” २००४ मध्ये आशियाई चित्रपटमहोत्सवात  दाखवलेल्या देवराई चित्रपटासाठी  अतुल कुलकर्णी यांना मिळालेला अवॉर्ड हा आमच्यासाठी आजही खास आहे . चित्रपट महोत्सवात ज्या प्रमाणे अनेक उत्तमचित्रपट एकत्र दाखवले जातात आणि  चित्रपटप्रेमी , चित्रपट समीक्षक एकत्र बसून चित्रपट अनुभवतात ही पद्धत अतिशय उत्तम आहे कारण त्यामुळे सिनेमा पाहण्याचीएक वेगळी भावना निर्माण होते . आणि चित्रपट  महोत्सव आयोजित करणाऱ्या टीम चे खरंच कौतुक आहे त्यांची या महोत्सव आयोजित करण्याची मेहनत भरपूर आहे.आज आमच्या चित्रपटाने या महोत्सवाचे उदघाटन होत आहे .  एक दिग्दर्शक म्हणून मला दडपण आले आहे आणि आशा करतो तुम्हा चित्रपट प्रेमींना आमचा चित्रपटआवडेल . “

१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मुंबईकर येथे प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळालेले चित्रपट व लघुपटांचा आस्वाद घेता येणार आहे.अर्जुन दत्ता या बंगाली दिग्दर्शकाचा ‘अव्यकतो  हा चित्रपट व शेखर बापू रानखांबेचा ‘पॅम्पलेट’ हा तीस मिनिटांचा  लघुपट आशियाई महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत. ‘अव्यकतो ही  इंद्र नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याची आई साथी, वडील  कौशिक व  त्याचा मित्र रुद्र जे त्याचे लाडके काका आहेत. या तीन व्यक्तिरेखेच्या संमिश्रनातेसंबंधातून इंद्राची झालेली मानसिक जडणघडण आपल्याला ‘अव्यक्त’ मध्ये पाहायला मिळते.

शेखर बापू रानखांबेच्या ‘पॅम्पलेट’ मधील  हा एक स्वछंद मुलगा आहे. तो अभ्यासापेक्षा पतंग उडवण्यात अधिक रमतो. त्याच्या हाती एक व्यक्ती पॅम्पलेट देतं. ह्यापॅम्प्लेटच्या झेरॉक्स काढून वाटल्या नाहीत तर तुझा घरावर अरिष्ट येईल. अशी भीती त्याचा मित्र त्याला घालतो. ह्या घटनेने भावविश्व ढवळून निघते, समाजातीलअंधश्रद्धेवर ‘पॅम्प्लेट’ नेमकेपणाने बोट ठेवतं

या दोन कलाकृतींच्या बरोबरीने अनेक लघुपट महोत्सवात यशस्वी ठरलेले ‘गोची ‘( दिग्दर्शक प्रियाशंकर  घोष )’ प्रॉन्स’ (दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये ) ‘द ड्रेनेज’ (दिग्दर्शकविक्रांत रामदास ) ‘परसेप्टिव्ह ‘(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे) ‘बेहरुपीया ‘(दिग्दर्शक पंकज बांगडे) ‘द  नॉट’  (दिग्दर्शक पंकज बांगडे ) हे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणारआहे.

मोबाईलच्या आसक्ती मुळे  संपर्क तुटलेल्या नायक (नंदू माधव) आपल्याला ‘द ड्रेनेज’ मध्ये आपल्याला पाहता येईल. ‘परसेप्टिव्ह’मधून आदिनाथ कोठारे ने धार्मिकसोहळ्यांकडे पाहण्याचा आगळा वेगळा दृष्टिकोन चित्रित  केला आहे. ओली अंडरवेअर वाळवंताना चुकून घर मालकाच्या छपरावर पडल्यानंतर ती काढताना नायकाचीझालेली ‘गोची’ आपल्याला मनमुराद हसू  येईल,  मुलाला शिकवायला हवे ह्या निर्णया पर्यन्त आलेला एक  मच्छिमार आपल्याला ‘प्रॉन्स ‘ मध्ये भेटेल.

यंदाच वर्ष ग. दि. माडगूळकर, पूल देशपांडे, व  सुधीर फडके ह्या दिग्ग्ज कलावंताचं जन्म शताब्दी वर्ष  आहे. ह्याच अवचित्य साधून १९५० साली प्रदर्शित झालेला ‘पुढचंपाऊल’ हा राजपरांजपे दिग्दर्शित चित्रपट महोत्सवातील सेंटर पीस म्हणून दाखवण्यात येणार आहे. ह्या चित्रपटाची पटकथा, गीते, ग. दि. माडगूळकर ह्यांनी  लिहिलीअसून सुधीर फडकेनी संगीत दिले आहे.  पूल देशपांडे व ग. दि. माडगूळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिलादिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.

या वर्षी एलआयसी आणि झी टॉकीज हे सहप्रयोजक असून या महोत्सवाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.affmumbai.org या बेबसाईट्वर सुरु झाले असून चित्रपटरसिकांना सिटीलाईट सिनेमामध्ये  २०  डिसेंबर पर्यंत दुपारी २ ते ८ या वेळात रजिस्ट्रेशन करता येईल.