१७ वा आशियायी चित्रपट महोत्सव १४ डिसेंबर पासून.. 

0
1555

 

 

 गोवा खबर:चित्रपट रसिकांसाठी मजेवानी असलेला १७ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १४ ते २० डिसेंबर सप्ताहात सिटीलाईट सिनेमा (माहीम) येथे संपन्न होणार आहे.

‘वेलकम होम’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. सुमित्रा भावे आणि सुनील सूखटनकर दिग्दर्शक असून त्यात मृणाल देव, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत.

 

महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.

 

ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.affmumbai.org या बेबसाईट्वर सुरु झाले असून सिटीलाईट सिनेमानं ७ डिसेंबर पासून दुपारी २ ते ८ या वेळात रजिस्ट्रेशन करता येईल.