१६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारिता दिवस

0
578

गोवा खबर:राज्यातील पत्रकार बांधवांच्या सहकार्याने माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे  १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीय वृत्तपत्र मंडळाच्या संस्थापक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी हा दिवस पाळण्यात येतो.

मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याहस्ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पणजीतील मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या परिषदगृहात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी माहिती खात्याचे सचिव  संजय कुमार उपस्थित राहतील.  ‘’रिपोर्टिंग इंटरप्रिटेशन: अ जरनी.’’ या विषयावर गट चर्चा होणार असून त्यात प्रसिध्द पत्रकार  राजेश मेनन,  अँश्ली रोझारियो, श्रीमती पामेला डिमेलो,  किशोर नाईक गांवकर भाग घेणार आहेत.  प्रमोद आचार्य या चर्चेचे मोडरेटर आहेत.

ज्येष्ठ पत्रकार  अँलिस्टर मिरांडा, महेश दिवेकर,  गणादिप शेल्डेकर यांचा यावेळी मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याहस्ते त्यानी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्द्ल सत्कार करण्यात येईल.

याशिवाय विविध पुरस्कार आणि माहिती खात्याने घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्याना बक्षिसे वितरीत करण्यात येईल. पत्रकारितेतील आजिवन कार्याबद्द्ल पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात येणार आहे. हा पुरस्कार  प्रसिध्द पत्रकार, लेखक लँम्बर्ट मास्कारेन्हास याना देण्यात येणार आहे.

उत्कृष्ठ संपादक पुरस्कार  परेश प्रभू याना, क्रिडा लेखन  मार्कुस मेरगुलाव, उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार  राजतिलक नाईक याना, कला व संस्कृती रिपोर्टिंगचा उत्कृष्ठ पुरस्कार गौरी मळकर्णेकर याना तर  रोहन श्रीवास्तव याना आरोग्य आणि स्वच्छता लिखाणासाठी, निबेदिता सेन याना ग्रामिण पत्रकारीतेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची दुर्मिळ छायाचित्रावर आधारित माहिती खात्याने छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते .  राजतिलक नाईक याना पहिले, गणेश शेटकर आणि कैलास नाईक याना दुसरे व तिसरे बक्षिस प्राप्त झाले.  सगुण गावडे,  प्रसाद शिरोडकर, आतिश नाईक,  अमेय नाईक, आणि  उपेंद्र नाईक याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.

गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजनेखाली आयोजित केलेल्या  गोव्यातील नवीन पर्यटक स्थळांचा शोध विषयावरील छायाचित्राचे पहिले बक्षिस राजतिलक नाईक याना तर   उपेंद्र  नाईक याना दुसरे,  गणेश शेटकर याना तिसरे बक्षिस प्राप्त झाले.  मनिष चोपडेकर,  वैभव भगत,  स्नेहा लोटलीकर, सगुण गावडे आणि  भारती नाईक याना उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त झाली.