१६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस

0
210

 

 

गोवा खबर:अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयातर्फे संचालनालयाच्या परिषदगृहात १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येणार आहे.

१६ ऑक्टोबर १९४५ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणि हा दिवस साजरा  करण्यासाठी जागतिक अन्न दिवस दरवर्षी एका नवीन संकल्पनेव्दारे साजरा करण्यात येतो.

यावर्षाची आंतरराष्ट्रीय संकल्पना आहे निरोगी आहारासाठी स्मार्ट उपाय”.कार्यक्रमास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे प्रमुख पाहुणे म्हणून तर आरोग्य सिचव अमित सतेजा आणि उत्तर जिल्हाधिकारी  आर. मेनका सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.