१५८३ मध्ये पोर्तुगीजांच्या विरोधात लढलेल्या कुंकळ्ळीच्या हुतात्म्यांना शांतादुर्गा सेवा समितीकडून मनाचा मुजरा

0
615
गोवा खबर: श्री शांतादुर्गा सेवा समिती व श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थाचे अध्यक्ष आणि श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानाचे अध्यक्ष यांनी कुंकळ्ळी येथे हुतात्मा स्मारकावर आज साळ नादीच्या पवित्र जलाचा जलअभिषेक केला. १५८३ साली ज्या हुतात्म्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात धर्मांतरा विरोधात व स्वधर्म, स्वसंस्कृति आणि स्वराज्य रक्षणासाठी महासंग्राम केला आणि जगात एक इतिहास रचला.
१५८३ मध्ये जेव्हा पोर्तुगीज सैनिक व जेजूईट पाद्रयांनी जेव्हा धर्मांतर करत करत कुंकळ्ळी गावात पोहोचले तेव्हा कुंकळ्ळी व कुंकळ्ळी सभोतलातिल गावातील लोकांनी त्यांच्या विरोधात बंड केले. त्याच्या नंतर समझोता व चर्चे साठी साळ नादीच्या किनारी असलेल्या ओसाळणा किल्यावर बोलावून त्यांना ठार मारण्यात आले. ज्या साळ नादीच्या पाण्यात त्यांचे रक्त सांडले, त्या साळ नादीच्या जलाने कुंकळ्ळी येथील हुतात्मा स्मारकावर जलाभिषेक करण्यात आला.
पुढील पिढीमध्ये जागृती व्हावी यासाठी श्री शांतादुर्गा सेवा समिती व कुंकळ्ळी सभोतलातिल गावातील नागरिक हा जलाभिषेक कार्यक्रम दर वर्षी एकत्र येऊन साजरा करतात. पण यावर्षी कोरोना महामारीमुळे लहान स्वरुपात साजरा करण्यात आला.