१२ मार्च रोजी स्व. दयानंद बांदोडकर यांची जयंती

0
451

 गोवा खबर: १२ मार्च रोजी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.  दयानंद बांदोडकर यांची जयंती पाळण्यात येणार आहे. यावेळी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, मंत्रीगण व इतर मान्यवरांसमवेत मिरामार येथील समाधीवर स्व. दयानंद बांदोडकर यांना पुष्पांजली वाहतील. तद्नंतर सकाळी ९.१५ वाजता पणजीतील जुन्या सचिवालयाजवळील आणि सकाळी ९.३० वाजता पर्वरीतील सचिवालय प्रकल्पातील स्व.  दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्यांवर पुष्पहार अर्पण करण्यात येईल.