१० मार्च ला झी युवावरील ‘अप्सरा आली’ चा महाअंतिम सोहळा दणक्यात !!

0
1268

 

टॉप अप्सरा मध्ये होणार नृत्याची जबरदस्त जुगलबंदी  !!!

 

गोवा खबर:संपूर्ण भारतात छोटा पडदा म्हणजेच टीव्ही पाहणारा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे , त्यात डेलीसोप बरोबर रिऍलिटी शोज सुद्धा तितक्याच चवीने पाहिले जातात. झी युवावरील सर्वच शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या वाहिनीवरील संगीत व नृत्यावर आधारित ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमाने तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी आणि इतर नृत्य प्रकारांवर आधारित १४ अप्सरांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे . येत्या रविवारी १० मार्च ला संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रमातील टॉप ५ अप्सरा महा अंतिम फेरीत एकमेकींशी स्पर्धा करणार आहेत. सुरेखाताई पुणेकर, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी या महा अप्सरांबरोबरच महागुरू सचिन पिळगावकर सुद्धा महा अंतिम फेरीच परीक्षण करतील .

 

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने अक्ख महाराष्ट्र गाजवलं . मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे , साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार , डोंबिवली फास्ट  किन्नरी दामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी , या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महा अंतिम फेरीपर्यंत धडक मारली . पारंपरिक लावणीचा साज, आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्म मधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणारी ऐश्वर्या काळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. वयाने लहान असल्याने सगळ्यांचे लाड करून घेणारी मालवणची लाडूबाई तिच्या परफॉर्मन्स मधून सगळ्यांनाच खुश केले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी या सगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. वडिलांचा नृत्याचा वसा चालवून प्रत्येक परफॉर्मन्स एकदम परफेक्ट करणारी श्वेता परदेशी. या पाचही जणींची लावणीची जुगलबंदी महा-अंतिम फेरीची चुरस वाढवेल. या पाचही जणींपैकी कोण बनेल महाराष्ट्राची पहिली अप्सरा? या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी कि एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्या असतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रेम, आपुलकी व खिलाडूवृत्तीने या पाचही अप्सरा अंतिम सोहळ्यात त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देतील . महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांची जुगलबंदी असेलंच पण त्याच बरोबर  महाअप्सरा सुद्धा  स्पेशल नृत्य परफॉर्म करणार आहेत .

 

अंतिम सोहळ्यात टॉप ५ अप्सरांची ही अंतिम टक्कर पाहायला विसरू नका, रविवार १० मार्च, रोजी संध्याकाळी ७ वाजता, झी युवावर!!! झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.