१०३ सायकल स्वारांनी ट्रायगोवाची सेंचुरी राईड पूर्ण केली

0
234

 

 

गोवा खबर: १०३ सायकल स्वारांनी ट्रायगोवा फाउंडेशनच्या सेंचुरी राईडची पूर्तता रविवारी ४ ऑक्टोबर रोजी मडगाव आणि पणजीमध्ये केली. ५३ सायकल स्वारांनी पणजी विभागातील राईड पूर्ण केली (५० किमी आणि १०० किमी राईड एकत्रित) आणि ५० सायकल स्वारांनी मडगाव विभागातील राईड पूर्ण केली. (५० किमी आणि १०० किमी एकत्रित).

पणजीतील राईडचे मुख्य आकर्षण म्हणजे विंग कमांडर आणि उत्कृष्ट सायकलस्वार अजित गुगलानी (वय ७८) यांचा यशस्वी सहभाग हे होते. एक निवृत्त भारतीय एअर फोर्स पायलट ज्यांनी एका महिन्यात दोन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे, त्यांनीही हि राईड आवडली असल्याची माहिती दिली. मी चिखली येथील रहिवासी असून उत्तर गोव्यातील सायकल रूट माझ्यासाठी नवीन होता आणि मला अशा नवीन रस्त्यांची मजा लुटायला आवडत असल्याचे ज्येष्ठ सायकल स्वारांनी सांगितले.

याचप्रमाणे भारतीय रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी 68 वर्षीय कार्लटन गोम्स हे मडगाव विभागातील ज्येष्ठ सायकलस्वार होते. गोम्स यांनी यशस्वीरीत्या ५० किमीची राईड पूर्ण केली. गोम्स म्हणाले, मी संपूर्ण राईडचा आनंद लुटला. मी फक्त लॉकडाउनच्या कालावधीतच सायकल चालविणे सुरू केले आहे आणि आमच्या दक्षिण गोव्यातील खेडय़ांतील हिरवेगार वातावरण पाहून मला आनंद झाला.

उत्कृष्ट सायकलस्वार आणि इएसआय कोव्हीड इस्पितळातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वजीत फळदेसाई यांनीही मडगाव विभागातील १०० किमी अंतराची राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली. फळदेसाई म्हणाले, माझ्यातील तणावाचे निराकरण करणारी हि १०० किमीची राईड होती. मी दररोज १२ ते १४ तास कार्यरत राहिलो आहे. सायकलस्वार डॉक्टर म्हणाले, सायकल चालवीत असताना ते कामाशी निगडित फोनही घेत होते, आणि राईड पूर्ण केल्यावर जबाबदारीने ते त्यांच्या कामासाठी हॉस्पिटलला रुजू झाले.

नुवे येथील अनुभवी मॅरेथॉन धावपटू रॉबर्ट डोरॅडो हे एक सामान्य लेडीज सायकल चालवत होते. त्यांनी प्रसन्न चेहऱ्याने ५० किमी मडगाव राईडला आपला सहभाग नोंदविला. ड्युराडो म्हणाले, “मी लॉकडाउन कालावधीत सायकल चालविणे सुरू केले आणि मला माझ्या फिटनेस रूटीमध्ये बीच सायकलिंग करण्यास आवडेल.

ट्रायगोवा फाउंडेशनचे संस्थापक आणि आयोजक राजेश मल्होत्रा यांनी सरकारच्या सुरक्षा निर्देशांचे पालन केल्याची माहिती दिली आणि सर्व चालक याबाबत अत्यंत शिस्तबद्ध असल्याची माहिती दिली. दोन्ही शहरातील सेंचुरी राईडसाठी सायकल स्वारांनी दिलेल्या यशस्वी योगदानाला पाहून मी आनंदी आहे.

ट्रायगोवाच्या ब्रेव्हेट सिझन (लाँग डिस्टन्स सायकलिंग)ची सुरवात १८ ऑक्टोबर रोजी २०० किमीच्या राइडने होईल, यासाठी नोंदणी सुरु झाली आहे.