१०० ॲथलीट्सनी प्रोपेडलेरझ ड्युआथलॉन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला

0
353
गोवा खबर : ३१ जानेवारी रोजी प्रोपेडेलर्ज क्लब ऑफ मडगावतर्फे आयोजित “व्होराड 5:55” डुआथलॉन शंभर ॲथलीट्सनी यशस्वीरित्या पूर्ण केला.
प्रोपेडलेर्झ क्लबने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पुरुष आणि स्त्रियांनी पहिल्यांदाच दक्षिण गोव्यातील वेल्साओ आणि कॅव्हेलोसीम दरम्यान 55 कि.मी. अंतरामध्ये सायकल चालवली आणि नंतर उतोर्डा बीचवर 2.5 कि.मी. किंवा 5 कि.मी धावले.
फातोर्डा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेल्या कार्यक्रमात ५५ कि.मी. अंतराचे सायकलिंग तसेच २.५ कि.मी. धावण्याची स्पर्धा २ तास आणि २ मिनिटांत पूर्ण करण्यात आली. तर ५५ कि.मी. सायकलिंग आणि ५ किमी धावण्याच्या प्रदीर्घ अंतर दोन तास १६ मिनिटात पूर्ण केले.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छताविषयक आणि सामाजिक अंतरावरील सर्व प्रकारचे कोविड सेफ्टी प्रोटोकॉल कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आले होते. उपस्थितांच्या योग्य सुरक्षेमुळे रस्ता सुरक्षा देखील सुनियोजित झाली. प्रोपेडेलर्ज क्लब मडगाव शहरात गेल्या सहा वर्षांपासून आपल्या सदस्यांसाठी नियमित सायकल राईडचे आयोजन करीत आहे.