होळी सणानिमित्त रेल्वेच्या 402 विशेष रेल्वेगाड्या

0
457

 

 

गोवा खबर:होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मार्च महिन्यात 402 विशेष गाड्या चालवणार आहे तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांनाही अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.

दिल्ली-पाटणा, दिल्ली-पुणे, मुंबई-वाराणसी, मुंबई-पाटणा, मुंबई-उडुपी, मुंबई-गया, अहमदाबाद-पाटणा, लखनौ-कोलकाता मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

सर्व प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय पथके उपलब्ध आहेत तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.