होम क्वारंटाईनसाठी मार्गदर्शक तत्वे

0
193

 

 गोवा खबर:केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणा-या प्रवाशांना कोरोना रोगाचा संसंर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या , कंटेन्मेंट भागातून प्रवास करून आलेली व्यक्ती, कोविड संसर्ग असलेल्या भागातून येणारी व्यक्ती, कोविड रोग असलेल्या घरात राहणारी, कोविड रोगीच्या सरळ संपर्कात आलेली व्यक्ती, कोविड रोग असलेल्या वातावरणात राहणाऱ्या व्यक्तीनी होम क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास त्यानी घरीच राहून काळजी घ्यावी.

      होम क्वारंटाईनसाठीची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे- होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीनी हवेशीर खोलीत रहावे त्यांच्यासाठी वेगळी टॉयलेट सुविधा असावी. जर एखाद्या कुटुंब सदस्याला त्याच खोलीत रहावयाचे असल्यास त्यांनी दोघामध्ये १ मिटराचे अंतर ठेवावे. वयस्कर व्यक्तींपासून तसेच गरोदर महिला, मुले आणि इतर रोग असलेल्या व्यक्तींपासून दूर राहणे गरजेचे आहे. ती किंवा तो व्यक्तीच्या हालचाली घरापर्यंतच मर्यादित असाव्या. त्यांनी लग्न समारंभ, अंत्यविधी अशा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये.

      क्वारंटाईन व्यक्तीने आपले हात साबणाने किंवा आल्कोहल असलेल्या सॅनिटायझरने वारंवार धुवावे. जेवणाचे ताट, पाणी पिण्याचा ग्लास, कप, टॉवल, बेडिंग किंवा इतर वस्तू इतर लोकांपासून वेगळ्या ठेवाव्या. त्या अदलाबदल करू नये. पूर्णवेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. प्रत्येकी ६ ते ८ तासांसाठी मास्क बदलावे आणि त्याची विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्कचा पुन्हा वापर करू नये.

      रूग्णाने, रूग्णाची काळजी घेणा-याने आणि घरात जवळचा संपर्क असलेल्यांनी वापरलेला मास्क सोडियम हायपोक्लोरीक सोल्युशनने निर्जंतुकीकरण करावे व त्यानंतर ते मास्क एकतर जाळून किंवा खोल दफन करून विल्हेवाट लावावी.

      वापरलेले मास्क संभाव्यतः संक्रमित मानले पाहिजे. खोकला ताप, श्वसनास त्रास उद्भवणे अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास तो किंवा ती व्य़क्तीने त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा ०११-२३९७८०४६ या क्रमांकावर कळवावे.

      होम क्वारंटाईन झालेल्या व्याक्तींच्या कुटुंब सदस्यानी अशा व्यक्तीची काळजी घेण्याचे काम फक्त कुटुंबातील एकाच सदस्यावर सोपविले पाहिजे. मळका कपडा वापरणे टाळावे किंवा त्वचेशी थेट संपर्क टाळावा. मळलेले कपडे धुताना डिस्पोजेबल ग्लोव्सचा वापर करावा. ग्लोव्स काडल्यानंतर हात धुवावे. व्हिजीटर्सना परवानगी देऊ नये.

      क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसून आल्यास त्यांच्याशी जवळचा संपर्क आलेल्या सर्व व्यक्तीनी १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करून घ्यावे आणि त्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक येईपर्यंत अतिरिक्त १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे.

     क्वारंटाईन व्यक्तीने दररोज १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशनचा वापर करून क्वारंटाईन व्यक्तीच्या खोलीत बेडफ्रेम, टेबल इत्यादी वस्तूना स्पर्श केल्यास त्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्या. ब्लिच सोल्युशनने शौचालय स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे व मळके कपडे वेगळे स्वच्छ करावे.