होमिओपथी लोकप्रिय उपचारपद्धती होत आहे: नाईक

0
1421
The Minister of State for AYUSH (Independent Charge), Shri Shripad Yesso Naik unveiling the plaque to lay the foundation stone of the National Institute of Homeopathy, at Narela, Delhi on October 16, 2018. The Member of Parliament, Shri Udit Raj and the Secretary, Ministry of AYUSH, Shri Vaidya Rajesh Kotecha are also seen.

गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील नरेला येथे राष्ट्रीय होमिओपथी केंद्राचा पायाभरणी सोहळा आज पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील ही संस्था कोलकाता येथील संस्थेचे विस्तारकेंद्र असणार आहे. होमिओपथीला देशात आणि जगभर मान्यता मिळत आहे. दिवसेंदिवस होमिओपथी लोकप्रिय उपचारपद्धती होत आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक यांनी केले. देशात आयुष अंतर्गत भारतीय उपचारपद्धतींच्या प्रसार आणि प्रचारासाठी मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतल्याचं ते म्हणाले. ‘आयुष’कडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी 2016 पासून सीबीएसईने राष्ट्रीय पात्रता परीक्षा चाचणी (नीट) सुरु केली आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय पदव्युत्तर चाचणी परीक्षा आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपथी केंद्र 10 एकर परिसरात उभारले जाणार आहे. यात 100 खाटांचे रुग्णालय, पदव्युत्तर आणि पीएच डी च्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उच्च दर्जाचे संशोधन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी एकूण 302 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध सात शाखांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. प्रत्येक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सात विद्यार्थी तर पीएच डी साठी 10 विद्यार्थी क्षमता असणार आहे.