हे गणराया व्हिडिओ गीताचे यु ट्यूबवर लोकार्पण

0
1282

गोवा खबर:क्रेझी मायंड्स निर्मित ‘ हे गणराया’ या कोकणी गणेशवंदन व्हिडिओ गीताचे यु ट्यूबवर लोकार्पण झाले. हा कार्यक्रम कला आणि संस्कृती खात्याच्या सभागृहात पार पडला.
यावेळी निर्माते अनय कामत, गायक कलाकार राजेश मडगावकर, संगीतकार दिलीप वझे व सिंधुराज कामत, गीतकार संजय बोरकर, कोरियोग्राफर चिन्मय बोरकर, व या व्हिडिओनिर्मीतीचे सर्व कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात चिन्मय बोरकर यांचे नृत्य व साईदत्त कामत यांचे मिमिक्री सादरीकरण झाले.
भगवान श्री  गणेशला समर्पित असलेल्या या गोड भक्तीगीताची निर्मिती अभिनेते अनय कामत यांनी केली आहे. त्यांनी स्वता या व्हिडिओत आपली भूमिका सादर केली आहे. तसेच चिन्मय बोरकर यांनी कोरियोग्राफी केलेली आहे. कोकणी भाषेतील गणपतीच्या गीतावरील हा पहिला नृत्य सादरीकरणाचा भक्तीगिताचा संगीत ट्रेक आहे.
संजय बोरकर यांनी हे गीत लिहलेले असून, प्रसिद्ध गायक राजेश मडगावकर यांनी हे गीत गायले आहे. तसेच विविध पुरस्कार प्राप्त संगीत कलाकार  दिलीप वझे आणि सिंधुराज कामत यांनी गीताची चाल तसेच संगीत आयोजनाची बाजू बघितली आहे.
” हे गीत म्हणजे पारंपारिक आरती नसून, एक विशेष असे गीत आहे. श्री गणपतीवर गोव्यात तयार झालेले हे कदाचित पहिले   व्हिडिओ गाणे आहे. आम्ही या गीतावर एकदम प्रोफेशनल पद्धतीने काम केले आहे. लोकांना ते नक्कीच आवडेक याची आम्हाला खात्री आहे.” असे अनय कामत यांनी यावेळी म्हटले.
अंदाजे ७० कलाकारांनी या व्हिडिओ गीतासाठी आपले योगदान दिले आहे. त्यात नृत्य कलाकार, चित्रीकरण करणारे कलाकार आणि इतरांचा समावेश आहे.
या व्हिडीओ गीताचे  चित्रीकरण श्री सांतेरी मंटप कामुर्ली बार्देज इथे करण्यात आले आहे. यु ट्युबच्या माध्यमातून हे गीत सर्वा पर्यंत पोहचविण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे.
या चतुर्थीला ही एक उत्तम संगीत भेट या निर्मिती गटाने सर्वांना दिली आहे. या निर्मितीच्या टीमने लोकांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हे गीत लावण्याचे आवाहन केले आहे.