हेरॉइन बाळगल्या प्रकरणी एकास अटक

0
879

गोवा:कळंगुट पोलिसांनी आज ड्रग्स विरोधात केलेल्या कारवाईमध्ये हेरॉइन बाळगल्या प्रकरणी कळंगुट येथील एकास अटक केली.कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई आज सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान झाली.ऑस्टिन डिसोझा हा 1 ग्राम हेरॉइन घेऊन कळंगुट पर्किंग परिसरात ग्राहकांना विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कीर्तिदास गावडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमुन करवाई करण्यात आली.यात ऑस्टिनला 1 ग्राम हेरॉइनसह अटक करण्यात आली.पकडण्यात आलेल्या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 10 हजार रुपये आहे.कारवाई केलेल्या पथकात पोलिस हवालदार विद्या आमोणकर,ब्रम्हानंद पोळजी,समीर सावंत सहभागी झाले होते.ऑस्टिन हा 2015 मध्ये एका गुह्यात सहभागी होता.